पुणे प्रवाह न्युज पोर्टल *मा अध्यक्ष खा शरद चंद्रजी पवार यांचे दहा वर्षापूर्वीचे ते पत्र खरे आहे पण याचा अर्थ असा नाही की या देशातला पोशींदा अदानी-अंबानीच्या दावणीला बांधला जावा* *पुणे :-* महाराष्ट्राचे मामु देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत आमचे दैवत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर टीका केली की २०१० साली पवार साहेबांनी पत्र लिहून कृषी कायद्याला समर्थन दिले होते. *पण* APMC *बंद करा असे कधीचं म्हटले* *नव्हते " दिशाभूल " राजकारणाची सवयं झालेल्या भाजपला अता पायाखालची जमीन सरकताना* *दिसत आहे ,आजच्या भारत बंद* *चा धसका एवढा भाजपनं घेतलायं की अता त्यातून बाहेर पडण्यासाठी पवार साहेबांच्या दहा वर्षापूर्वीच्या पत्राची गरज भासली आहे* देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कालच्या पत्रकार परिषदेत २०१० साल आठवले आणि त्यावेळी पवार साहेबांनी कुठले पत्र लिहले हे पण तुम्हाला आठवले तसेच २०१४ साली तुमचे नेते नरेंद्र मोदी जी प्रत्येक प्रचार सभेत सांगत होते व भाजपच्या जाहीर नाम्यात असे लिहले होते प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर १५ लाख रूपये टाकणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या उपलब्ध करणार. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक उभे करणार.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू मिल मधील स्मारकांचे काय झाले???, पहिल्या अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण देणार होता त्यांचे काम झाले??? देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कालच्या पत्रकार परिषदेत ह्या गोष्टी आठवल्या नाहीत का? जाणीवपूर्वक ह्या गोष्टींचा उल्लेख करणे तुम्ही टाळले का? याचे उत्तर देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला मिळेल का? *विशाल भोसले. कट्टर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक.*
Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image