माथेरानच्या पर्यटनासाठी आणखी एक पाऊल.... माथेरानची माहिती देणारे अँप लवकरच संगणकावर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



माथेरानच्या पर्यटनासाठी आणखी एक पाऊल....


माथेरानची माहिती देणारे अँप लवकरच संगणकावर


कर्जत,ता.3 गणेश पवार


                  माथेरान नगरपरिषदे मार्फत पर्यटकांच्या माहितीकरिता बनविण्यात येणाऱ्या "माथेरान अँप" चे डिसेंबर महिन्यात होणार लौंचिंग केले जाणार आहे.माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्या माध्यमातून पर्यटकांसाठी बहुपर्यायी अशा या अँपची निर्मिती केली जात आहे.


                  ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी शोधून काढलेल्या माथेरानच्या जागतिक आणि ऐतिहासिक दर्जाचे पर्यटन स्थळाने पर्यटन जगतात नावलौकिक मिळविले आहे.2400 फूट उंचीवर असलेल्या पर्यटन स्थळावर प्रवेश केल्यानंतर वाहनांना बंदी असल्याने वाहनांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास नाही.त्यावर सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना आवश्यक असलेले ऑक्सिजन देणारे पर्यटन स्थळ म्हणून माथेरान ओळखले जाते.54 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या माथेरान मध्ये असंख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि या पर्यटन स्थळाचे नियंत्रण राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने माथेरानमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार एक पाऊल पुढे आहे.अशा या थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानची ओळख आणि माहिती डिजिटल असावी यासाठी गेली काही महिने माथेरान गिरीस्थान नगरपरिषद प्रयत्न करीत आहे. संगणकाच्या युगात सर्व जगाच्या कानाकोपऱ्यात माथेरान पोहोचावे यासाठी माथेरानचे अँप बनवले जात आहे.माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांना पॉईंट्स,हॉटेल,रेस्टॉरंट, वन्यजीव,पर्यावरण, ऐतिहासिक पार्श्वभूमी कळावी तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे माथेरान दस्तुरी नाका येथे पर्यटकांची होणारी मोठ्या प्रमाणातील फसवणूक याला आळा घालण्यासाठी आणि त्यामुळे माथेरान ची होत असलेली चुकीची माहिती देण्याचे प्रमाण थांबू शकते.दस्तुरी नाका येथे पर्यटकांना दिली जाणारी चुकीची माहिती यामुळे पर्यटनावर झालेला विपरीत परिणाम लक्षात घेता "माथेरान अँप" फायद्याचे ठरू शकते.त्यात या अँप मुळे पर्यटकांना चुकीची माहिती देणारे प्रकार बंद होऊ शकतात आणि आळा देखील बसू शकतो. 


                 दुसरीकडे या अँप मध्ये पर्यटकांना माथेरान मध्ये फिरण्यासाठी घोडे,हातरिक्षा, कुली,आदींची सर्व माहिती असणार आहे.त्याचवेळी घोडे, कुली आणि हातरिक्षा यांचे दर याची माहिती असून या अँप वर निमशासकीय यंत्रणा म्हणजे माथेरान गिरीस्थान नगरपरिषदचे नियंत्रण असणार आहे.


माथेरान मध्ये आल्यानंतर सर्व पर्यटक हा अँप डाउनलोड करून शहरात प्रवेश करू शकतात.दस्तुरी नाका येथे एन्ट्री तिकिट घेतल्यानंतर वायफ च्या मदतीने क्यूआर कोड स्कॅनद्वारे हे अँप डाउनलोड करता येणार आहे.तसेच गुगल आणि अँपल च्या प्ले स्टोअर वरून ही डाउनलोड करता येणार आहे.या अँपच्या माध्यमातून माथेरान विषयी ची विविध माहिती पुरवली जाणार असून, ओला आणि उबेर च्या धर्तीवर घोडेवाला,रिक्षावाला यांचे नाव आणि मोबाईल नंबर नगरपालिका तर्फे वार्षिक शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.जेणेकरून पर्यटक अँप च्या द्वारे संपर्क साधू शकेल,त्यात त्या घोडेवाला तसेच रिक्षावाला यांची सम्पूर्ण माहिती असणार आहे.त्यात तरी पर्यटकांची फसवणूक केली तर त्यांना अँप च्या माध्यमातून तक्रार देखील करता येणार आहे.यात नाव रजिस्टर करण्यासाठी माथेरानच्या स्थानिक भूमिपुत्रांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.या अँप मध्ये भरपूर उपयोगी फिचर असून सदरच्या अँप अजून दर्जेदार बनविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सूचना आणि कल्पना आमच्या पर्यंत पाठवा किंवा कमेंट्स शेअर करू शकता असे आवाहन माथेरान गिरीस्थान नगरपरिषदचे गटनेते आणि या वेगळ्या प्रकल्पाचे निर्माते प्रसाद सावंत यांनी केले आहे.


फोटो ओळ


अँप चे चित्र


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image