शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी होणाऱ्या "भारत बंद" ला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा प्रकाश आंबेडकर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी होणाऱ्या "भारत बंद" ला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा


प्रकाश आंबेडकर


अध्यक्ष


वंचित बहुजन आघाडी


पुणे :- केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसह शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी या मागणीसाठी 8 डिसेंबर 2020 रोजी 'भारत बंद' ची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडी या बंद मध्ये सहभागी होत असून सर्वांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करीत आहे. उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे सरकारने रद्द करावेत. शेतमालाला किमान हमीभावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे. बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तात्काळ 50% रक्कम शेतकन्यांच्या खात्यावर जमा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहे.


(प्रकाश आंबेडकर)


अध्यक्ष


वंचित बहुजन आघाडी