सारथी कार्यालयासमोर दिनांक ०७/१२/२०२० पासून सर्व मराठा संघटनांना सोबत घेउन बेमुदत ठिया आंदोलन करणे बाबत.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


विषय : सारथी कार्यालयासमोर दिनांक ०७/१२/२०२० पासून सर्व मराठा संघटनांना सोबत घेउन बेमुदत ठिया आंदोलन करणे बाबत.


पुणे :- आदरणीय साहेब शाहू महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या संस्थेमध्ये आमच्यावर आमची चुक नसतांना देखील अन्याय होतोय हे मोठ दुदैव आहे. महाराष्ट्र शासनाच्या४ जुन २०१८ च्या Memorandom of Association नुसार ०७ ऑगष्ट २०१९ मध्य देनिक लोकमत, पुण्यनगरी तसेच सारथीच्या वेबसाईटला तारादुत प्रकल्पाची जाहीरात आती. या जाहीरातोनुसार विभागनिहाय परीक्षा तसेच मुलाखत घेऊन तारादुत्तांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या तारादुतांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशीक येथे एक महिण्याचे निवासी प्रशिक्षण तसेच पुणे येथे कौशल्या विकास प्रशिक्षण देण्यात आले आणि तारादतांना कर डिसंबर २०१९ पासून ११ महीणे करारांचा आदेश देण्यात आला.


तात्कालीन व्यवस्थापकीय संचालकाने ०६ मार्च २०२० रोजी तारादत प्रकल्पाला स्थगांती देण्यात आली तसेच २७ मार्च रोजी एक पत्रक काढणे. तारादूताला नोंदणीकृत बंधपत्र तसेच सारथीचे ओळखपत्र जमा करुण तुमच्या सेवा समाप्त करण्यात येतील असे सांगीतले. परंतु कोणत्याही तारादुताने सारथी कार्यालयाला नोंदणीकृत बंधपत्र किंवा ओळखपत्र जमा केलेले नाही. 


तसेच


मा. मंत्री विजय वडेट्टीवार साहेबांच्या सोबत मंत्रालय दालनात झालेल्या बैठकीमध्ये तारादुत प्रकल्प चालु राहील असे सांगीतले होते त्या बैठकीला आदरणीय श्री युवराज छत्रपती संभाजी राजे देखील उपस्थीत होते. परंतु प्रकल्पावरील स्थगीती उठवली नाही.