उद्योगपती शंकरदत्त ज महाशब्दे यांचे दुःखद निधन 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल उद्योगपती शंकरदत्त ज महाशब्दे यांचे दुःखद निधन 


पुणे :- जेष्ठ उद्योगपती आणि द्वारका शारदा पिठाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी शंकरदत्त ज महाशब्दे (वय ८५ वर्षे) यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा,विवाहित दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.अत्यंत खडतर आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करीत त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. आय.इ.सी एअर टूल्स प्रा.ली. ही कंपनी त्यांनी स्थापन केली व अल्पावधीतच ही कंपनी आंतरराष्ट्रीय किर्तीची बनवली. दीर्घकाळ ते या कंपनीचे अध्यक्ष होते. आता त्यांचे चिरंजीव अमरनाथ हे कंपनीचे अध्यक्ष आहेत.गुजरातच्या द्वारका शारदा पीठाने त्यांचा 'वाणिज्य रत्नाकरम' असा मानाचा बहुमान देऊन त्यांना गौरविले होते. त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित 'सार्थक' हे त्यांचे आत्मचरित्र काही काळापूर्वी प्रकाशित झाले होते. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


- आबा बागुल


सोबत- छायाचित्र व मयत पासची प्रत