स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता

पुणे प्रवाह न्युज पोर्टल सांग तू आहेस का’ मालिकेद्वारे सानिया चौधरीचं मालिका विश्वात पदार्पण


मुंबई :- स्टार प्रवाहवर ७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेद्वारे अभिनेत्री सानिया चौधरी पदार्पण करते आहे. मुख्य भूमिका असलेली ही तिची पहिलीच मालिका. लहानपणापासूनच सानियाला अभिनय आणि नृत्याची आवड होती. सानिया मुळची पुण्याची त्यामुळे पुण्यातच तिने नृत्य शिकण्यासोबतच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अनेक वर्कशॉप्स, नाट्यस्पर्धा आणि थिएटर केल्यानंतर तिला हिंदी वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सानियाचं टॅलेण्ट पाहून तिला स्टार प्रवाहच्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेसाठी ऑडिशनसाठी सांगण्यात आलं. पाच ते सहा वेळा ऑडिशन आणि लूक टेस्ट दिल्यानंतर तिची वैदेही या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली.


PROMO: https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/134780804783082


माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत असल्याचं सानिया सांगते. मालिकेचा प्रोमो ऑनएअर गेल्यानंतर मला खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. हॉरर आणि रोमान्स हा जॉनर मी पहिल्यांदाच करत आहे. त्यामुळे खूप उत्सुकता आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि शिवानी रांगोळेसोबत पहिल्यांदाच काम करते आहे. आम्ही तिघेही पुण्याचे असल्यामुळे आम्हा तिघांची खूप छान गट्टी जमली आहे. हीच केमिस्ट्री तुम्हाला मालिका बघताना नक्कीच जाणवेल. त्यामुळे आता उत्सुकता आहे ७ डिसेंबरची. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*