इंदिरा गांधी सेवारत्न पुरस्काराने समाजसेवक हिंदरत्न दिपक लोंढे सन्मानित

प्रति,


मा.मुख्य संपादक


पुणे प्रवाह,पुणे करीता..



इंदिरा गांधी सेवारत्न पुरस्काराने समाजसेवक हिंदरत्न दिपक लोंढे सन्मानित


सांगली :- 'हिंदरत्न' जीवरक्षक मानव.सांगली.(महाराष्ट्र राज्य) सामाजिक बांधिलकीतुन समाजसेवा करणाऱ्या आणि अखिल भारतीय प्राचीन संस्कृती साधना केंद्र महाराष्ट्र राज्य जन आरोग्य सेवा करणाऱ्या ह्या आपल्या संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष आणि भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा ह्या राष्ट्रीयकृत संस्थेचे महाराष्ट्र राज्य प्रबंधक ह्या नात्याने अत्याचारी महिलांना न्याय मिळवून देणारे, त्यांचे सबलीकरण करणेसाठी धडपडणारे समाजसेवक 


प्रसिद्ध कवी,गीतकर,लेखक,हिंदरत्न दिपक लोंढे यांना कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील गोल्डन केअर क्लब,ह्या राष्ट्रीयकृत संस्थेने त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुण्यस्मरण दिन निमित हिंदरत्न दिपक लोंढे यांना इंदिरा गांधी समाजरत्न पुरस्कार २०२० ह्या अत्युच्च मानाच्या अलौकिक पुरस्काराने सन्मानित केले आहे.हिंदरत्न दिपक लोंढे यांच्या अतुलनीय निस्वार्थ समाजसेवेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत दखल घेतली जात असून नुकताच त्यांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंती निमित्त सरदार वल्लभभाई पटेल जीवनगौरव पुरस्कार 2020 मिळाला होता.


आज अखेर त्यांना विविध सरकारी,निमसरकारी,सहकारी आणि खाजगी संस्थांनी २०३ सन्मानपत्र आणि ४५ पेक्षा जास्त अत्युच्च मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा व त्यांच्या सेवाभावी संस्थेचा सन्मान केला आहे..गौरव केला आहे. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी ग्लोबल पिस अवॉर्ड २०२०,डॉ.आंबेडकर सेवा सन्मान पुरस्कार,मदर टेरेसा वर्ल्ड पिस अवॉर्ड २०२०,नॅशनल इंडियन आयकॉन अवॉर्ड २०२०,मदर टेरेसा समाजसेवा पुरस्कार २०२०,डॉ, ए. पी.जे.अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड २०२०, इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड २०२०,अटल सेवा सन्मान पुरस्कार,मानवतेचा दीप स्तंभ पुरस्कार २०२०,एक्सलेन्स अवॉर्ड २०२०,सेवा योद्धा अवॉर्ड,साध्वी विभा मुनी योगा रत्न अवॉर्ड,कर्मवीर पुरस्कार हे अत्युच्च मानाचे अलौकिक पुरस्कार मिळाले असतानांच आज पुन्हा त्यांना इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरण दिन निमित्त इंदिरा गांधी सेवारत्न 2020 ह्या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात आणखी एका मानाच्या पुरस्काराचा तुरा खोवला गेला आहे 


हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर हिंदरत्न दिपक लोंढे म्हणाले आज माझ्या निस्वार्थ समाजसेवेचा आपल्या देशातील कित्येक राज्यांनी व राज्यांतील विविध राष्ट्रीयकृत संस्थांनी दखल घेऊन माझेवर सन्मानपत्र आणि पुरस्काराचा अगदी वर्षांव केला आहे.अजूनही करीत आहेत.ही माझ्या जीवनांतील अत्यानंदाची बाब आहे.मला मिळालेला हा प्रत्येक पुरस्कार मी माझ्या देशातील सर्व राष्ट्रपुरुष,राष्ट्रसंत आणि देशवासीयांसह माझ्या मातापिता, गुरुजनांना,बंधू भगिनींना आणि मित्रांना समर्पित करीत असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितले आहे.माझ्या देशवासीयांविना ही माझी समाजसेवा अधुरी असल्याचं सांगून ते पुढे म्हणाले की माझ्या देशवासियांच्या प्रेरणेतूनच मी आज समाज सेवेच पवित्र कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडत आहे.त्यांचं पाठबळ, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हाच माझ्या जीवनाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे अस अभिमानाने त्यांनी सांगितले आहे.