महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघप्रणित शिक्षक आघाडीच्या वतीने, मा . व्ही के . खांडके नूतन शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचा सत्कार करण्यात आला....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघप्रणित शिक्षक आघाडीच्या वतीने मा .श्री अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला व शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याबाबतचे निवेदन सादर केले .यामध्ये प्रमुख्याने उच्च न्यायालयाचा आदेश झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या तात्काळ करण्यात याव्यात .काही माध्यमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या अन्यायकारक व जातीय आकस मनात ठेवून करण्यात आलेल्या आहेत या बदल्या त्वरीत रद्द करण्यात याव्यात .पुणे जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या विनंती बदल्या करण्यात याव्यात .या बदल्यांमध्ये दुर्गम भागातील शिक्षक बंधू-भगिनींना प्राधान्य देण्यात यावे .माध्यमिक शिक्षकांच्या वैद्यकीय बिलास तसेच भविष्य निर्वाह निधी मंजुरीस होणारा विलंब कमी करण्यात यावा इ .मागण्यांचा समावेश आहे . यावेळी श्री .गौतम कांबळे राज्य महासचिव श्री . अतुल जेकटे जिल्हा कार्याध्यक्ष पुणे श्री .गोरखनाथ लडकत तालुका संघटक वेल्हा श्री चंद्रकांत शिंदे तालुका संघटक भोर हे पदाधिकारी उपस्थित होते .


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या