पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*मनसे पदवीधर मतदार संघातील उमेदवार सौ. रुपालीताई पाटील यांना जीवे मारण्याची धमकी*,
*पुणे :-* (प्रतिनिधी); राज्यात पुणे पदवीधर मतदार संघाकरिता निवडणूक घोषित होऊन, निवडणूकीच्या प्रचाराला सर्व च पक्ष लागले. असताना, राज्यात नजीकच्या काळात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे.विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र या निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेच्या पुण्याच्या महिला अध्यक्ष रूपालीताई पाटील या महिला उमेदवारास साताऱ्यातील एका तरुणाने अज्ञात क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात रूपालीताई मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती अशी की मनसेचे उमेदवार रूपालीताई पाटील या अलीकडेच प्रचारासाठी सातारा जिल्ह्यात गेल्या होत्या. त्या पुण्यात आल्यानंतर शनिवारी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका तरुणाचा फोन आला. तो फोन रूपाली ताईंच्या एका महिला सहकारी महिलेने उचलला तेव्हा पलीकडून धमकी दिली’.
मी साताऱ्यातील एका गावातून तुला लबाडे बोलतोय रूपालींना सांगा पुण्यात जिथे असेल तो पत्ता शोधून तुला संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नको’. याबाबत रूपालीताई पाटील यांनी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. व आपण रविवार पासून पुन्हा सातारा दौऱ्यावर जात आहोत, तेव्हा आपण तातडीने त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात यावी व शिक्षा करावी व मला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली.