डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती


       पुणे,दि.2 :- डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती करण्यात येणार असून दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस इमारत, जंगली महाराज रोड, पुणे-5 येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत थेट मुलाखती घेण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीण अधीक्षक डाकघर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


 उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे या दरम्यान असावी. उमेदवार मान्यता प्राप्त संस्थामधून दहावी, बारावी उत्तीर्ण असावा, तसेच विमा क्षेत्रातील माहिती व विपणन कुशलता असणे आवश्यक राहील. बेरोजगार/स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार/कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता,माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा एजंट यासाठी पात्र राहतील.


 थेट नियुक्तीनंतर टपाल विभागाने निर्धारित केलेले कमिशन प्रोत्साहन भत्ता नियमितपणे देण्यात येईल. मुलाखतीनंतर उमेदवार नियुक्त केले जातील व नियुक्त उमेदवारांना अतिरिक्त प्रशिक्षण देण्यात येईल.


 नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी स्वखर्चाने विभागीय कार्यालय, पुणे येथे उपस्थित रहावे लागेल. परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परवाना देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरिता रुपये 250 आणि परवाना परीक्षेसाठी रुपये 285 फी भरावी लागेल. तसेच रु.5000 टपाल बचत बँक खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्र मध्ये तारण म्हणून ठेवणे बंधनकारक आहे.


 मुलाखतीस येताना शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्तावेज समवेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी श्री.व्ही.एस.देशपांडे, मोबाईल क्र.9420965122 या क्रमांकावर संपर्क साधावा.


00000


Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image