एमएससीआयटी पूर्ण करण्यास मुदतवाढ देऊन शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित ठेवलेली फरक बिले त्वरित देण्यात यावीत... गौतम कांबळे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



एमएससीआयटी पूर्ण करण्यास मुदतवाढ देऊन शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित ठेवलेली फरक बिले त्वरित देण्यात यावीत .


गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी.


पुणे :- याबाबत सविस्तर माहिती देताना श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी म्हणाले की ,महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री अरुण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मा . नामदार हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .त्यामध्ये प्रमुख्याने पुढील मागण्यांचा समावेश आहे .


1प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे सुधारीत धोरण निश्चित करण्यात यावे .बदल्या ऑनलाईन पद्धतीने विनामानवी हस्तक्षेप करण्यात याव्यात .


प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या तालुक्याबाहेर करण्यात येऊ नयेत .


पेसा क्षेत्रात बदल्या करताना प्रथम विनंती बदलीने जाण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांना प्रथम संधी देण्यात यावी .


ग्रामविकास विभागात रिक्त असलेल्या जागांचा अनुशेष विशेष भरती मोहीम राबवून भरण्यात यावा .


प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना विशेष बाब म्हणून संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी डिसेंबर 2020पर्यंत देण्यात यावी .उशिरा संगणक अहर्ता परीक्षा पास झाल्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच निवड श्रेणीची फरक बिले अदा करण्यात आलेली नाहीत . ती तात्काळ देण्यात यावीत .


 दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळणे आवश्यक आहे . त्यामुळे वीस पटाच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नयेत .


covid-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यामुळे 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्याचाआदेश रद्द करण्यात यावा .प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्याशिवाय शाळा सुरू करण्यात येऊ नयेत .


 खाजगी संस्थांना शासन सर्व प्रकारचे अनुदान देत असल्याने खाजगी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद )यांना देण्यात यावा .संस्था प्रमुखांचा बदल्या करण्याचा अधिकार रद्द करण्यात यावा .


अनेक संस्था प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा ठराविक रक्कम संस्थेला देण्याची सक्ती करतात व रक्कम न दिल्यास गैरसोयीची बदली करण्याची व गोपनीय अभिलेख खराब करण्याची धमकी देतात .त्यामुळे अनेक शिक्षक मानसिक दबावाखाली काम करत आहेत .शिक्षकांना मानसीक स्वाथ्य मिळण्यासाठी व आनंददायी वातावरणात अध्यापन होण्यासाठी खाजगी संस्था प्रमुखांचे बदलीचे अधिकार त्वरित रद्द करण्यात यावेत .


 covid-19 चे काम करत असताना अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत .त्यांना 50 लाख विमा संरक्षण योजनेची रक्कम तात्काळ देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपातत्वावर प्राधान्यक्रमाने नोकरी देण्यात यावी . 


शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पोलीस विभागाप्रमाणे कॅशलेस आरोग्य सुविधा देण्यात यावी


 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा एक तारखेला करण्यात यावेत .आशासेविका व अंगणवाडी कार्यकर्ता व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी .या निवेदनाच्या प्रती मा .उद्धवजी ठाकरे ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा .अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आल्या आहेत .


यावेळी श्री अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष श्री आनंद खामकर अतिरिक्त महासचिव श्री गजानन थुल राज्य सरचिटणीस श्री .सिताराम राठोड जिल्हाध्यक्ष नागपूर हे पदाधिकारी उपस्थित होते .