किरकोळ वादातून स्कूल बस जाळण्याचा प्रकार नेरळ पिंपळोली येथे घडला आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल किरकोळ वादातून स्कूल बस जाळण्याचा प्रकार नेरळ पिंपळोली येथे घडला आहे.


कर्जत दि.18 गणेश पवार


     गावा बाहेर उभ्या असलेल्या तीन स्कूल बसेस ह्या अज्ञात व्यक्तींकडून जाळण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास गावातील नागरिकांना अचानक आगीचा प्रकाश समोर आल्याने ही घटना समोर आली. घटनास्थळी अग्निशमन वाहन पोहचे पर्यंत तीनही बस जळून खाक झाल्याने गावात एकच खळबळ उडाली.


  धक्कादायक म्हणजे किरकोळ वादातून ह्या बसेस जाळण्यात आल्याचा संशय बस मालकाने व्यक्त केला आहे.


        मिळालेल्या माहिती नुसार कर्जत तालुक्यातील नेरळ- पिंपळोली येथे राहणारे चंद्रकांत सोनावले यांच्या मालकीची असलेली खाजगी स्कूल बसेस ह्या लॉकडाऊन काळात स्कूल बंद असल्याने नेहमी प्रमाणे गावाशेजारी मोकळ्या जागेत उभ्या करण्यात आल्या होत्या.मध्यरात्रीच्या सुमारास ह्या स्कूल बसला लागलेल्या आगीने पेट घेतल्याने अचानक पडलेल्या प्रकाशाने गावातील स्थानिकांनाच्या मदतीने ही बाब समोर आली.


     घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी कर्जत तालुक्याचे DYSP अनिल घेर्डीकर तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर ह्यांनी धाव घेतली.


         या बाबत बस मालक चंद्रकांत सोनावले यांच्याशी आमचे प्रतिनिधीनी संपर्क साधला असता सोनावले यांनी गावातील काही मंडळींशी किरकोळ वाद झाल्याचे सांगितले तसेच,त्या वादातूनच हा प्रकार घडला असल्याचे सोनावले यांनी आपला संशय व्यक्त केला आहे. सोनावले यांनी आपली प्रतिक्रिया on-camera देणे टाळले आहे. गावात झालेला किरकोळ वाद ह्या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आल्याचे समजते.


    या बाबत आता नेरळ पोलिसांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे तर अधिक चौकशी नेरळ पोलीस करीत असून,गावात सध्या ताण-तणाव वाढूनये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


      कर्जत परिसरात सध्या क्राइम वाढल्याचे चित्र समोर येत आहे.यामुळे तालुक्यातील क्राईम रोखण्यास DYSP अनिल घेर्डीकर व नेरळ पोलीस ठाणे हद्दीत होत असलेल्या क्राईम घटनांवर नव्याने नियुक्त झालेले नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर हे कसा तपास घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या