कर्जत तालुक्यात काँग्रेस पक्षात नवनियुक्त्या जाहीर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



कर्जत तालुक्यात काँग्रेस पक्षात नवनियुक्त्या जाहीर


कर्जत दि.3 गणेश पवार


          लॉकडाऊन नंतर आलेली मरगळ झटकण्यासाठी सगळेच पक्ष, संघटना पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. कर्जत येथे भारतीय काँग्रेस पक्षाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पक्षात नवनियुक्त्या जाहीर करून काही प्रवेश देखील करण्यात आले. या बैठकीतून मरगळ झटकून तालुक्यात पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. 


      भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी व कर्जतचे माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे (अण्णा) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कर्जत येथे अभिवादन कार्यक्रम व कर्जत तालुका काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षामध्ये नवनियुक्त्या करून त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष पदी फईम अढाळ, कर्जत विधानसभा युवक काॅंग्रेस चिटणीस पदी कमलाकर पाटिल, नेरळ शहर आदिवासी अध्यक्ष पदी जगन्नाथ शेंडे, खांडस पंचायत समिती अध्यक्ष पदी मंगल माळी यांची नियुक्ति करण्यात आली. तर पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्या व महिलांमध्ये दांडगा जनसंपर्क असलेल्या दिपाली पाटिल यांची कर्जत तालुका महीला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्ष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व दीपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही महीलांनी यावेळी पक्ष प्रवेश देखील केला. मध्ये सुवर्णा आजगावकर, कुल्सम गोलंदाज आदी महिलांनी पक्षात प्रवेश केला.            


             यावेळी रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रद्धाताई ठाकूर, जिल्हा इंटक अध्यक्ष किरीट पाटील, जिल्हा युवक काॅंग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, कर्जत विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सागर परदेशी, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, कर्जत विधानसभा युवक काँग्रेस सोशलमिडीया अध्यक्ष अजिंक्य गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सागर सुखदरे,जिल्हा सरचिटणीस तमसील भाईजी, पनवेल विधानसभा युवक काॅंग्रेस अध्यक्ष विश्वजीत पाटील, नेरळ शहर युवक काॅंग्रेस अध्यक्ष यतिन यादव,युवा कार्यकर्ते रविश पोंजेकर,खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जाॅन, माजी नेरळ शहर अध्यक्ष अरविंद कटारिया यांसह सोशल डिस्टनसिंगचे पालन करत कार्यकर्ते उपस्थित होते.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image