आद. राष्ट्रीय अध्यक्ष अॅड मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून, पुणे पदवीधर मतदार संघाकरिता उमेदवार  प्रा. सोमनाथ साळुंखे आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार मा. संग्राम शिंदे हे निवडणूक रिंगणात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



आद. राष्ट्रीय अध्यक्ष


अॅड मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून, पुणे पदवीधर मतदार संघाकरिता उमेदवार 


प्रा. सोमनाथ साळुंखे आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार मा. संग्राम शिंदे हे निवडणूक रिंगणात


पुणे :- आद. राष्ट्रीय अध्यक्ष


अॅड मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून, 


पुणे पदवीधर मतदार संघाकरिता उमेदवार


प्रा. सोमनाथ साळुंखे आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार मा. संग्राम शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत.


पुणे पदवीधर मतदार संघातुन


प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी पुणे प्रवाह प्रतिनिधी शी बोलताना सांगितले की, 


पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे साडेपाच लाख मतदार असून सर्वाधिक मतदार हे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. त्या पाठोपाठ सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीत 15 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची संख्याही जास्तीत जास्त वाढली, असून मतदानाचा टक्का ही वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मतदानासाठी अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे. यावेळी पुणे पदवीधर मतदार संघात, वंचित बहुजन आघाडीने ही आपला उमेदवार दिल्याने, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी, एकत्रित रित्या योग्य नियोजन करून, पुणे पदवीधर मतदार संघात वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्रचार केला तर, विजय अवघड नाही, असा निर्धार प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी पुणे प्रवाह न्युज शी बोलताना सांगितले. 


तसेच 


शिक्षक मतदारसंघातून निवडणूकीं ला सामोरे जाणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मा. संग्राम शिंदे 


यांनी सांगितले की, हुशार, अभ्यासू व निर्भिड व्यक्तीमत्वा ला निवडून देणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. शिक्षक मतदार संघाच्या या सर्व समस्या व त्याचा स्वतंत्र अजेंडा घेऊनच मी ही निवडणूक लढवत आहे. आजचा पदवीधर हा सुज्ञ आहे. गरज आहे मला आपल्या सोबतीची, 


पुणे शिक्षक मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून मी संग्राम शिंदे रिंगणात उतरलेलो आहेत. यावेळी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार आपल्या सर्वाच्या सहकार्याने केला आहे.अशी प्रतिक्रिया पुणे प्रवाह प्रतिनिधी शी बोलताना त्यांनी व्यक्त केली. 


राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सरकारी योजना प्रभावी पद्धतीने राबविल्या, तर यावर उपाय ठरू शकतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलेली आहे. आरक्षणाच्या कचाट्यात परिक्षा अडकलेल्या आहेत. महापोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी होण्याची गरज आहे. तीन वर्षांपासून पोलीस भरती करू, असे पोकळ आश्वासन दिले जात आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हातात काय मिळते, हा मोठा प्रश्न आहे. शासकीय निकऱ्यामध्ये कंत्राटीकरण सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे." असेही त्यांनी सांगितले.