शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी पुणे स्वारगेट येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी आहेत त्याठिकाणी राहून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथील बाळासाहेब कालादालन, स्वारगेट, पुणे येथे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


या दरम्यान ना.डॉ.गोऱ्हे बोलतांना म्हणाल्या की, शिवसेना प्रमुखांनी ८०%समाजकारण व २०% राजकारण अशी भुमिका मांडली होती. आता मात्र कोरोना काळात मा.मुख्यमंत्री ना.ऊद्धवसाहेब ठाकरे १००% सामाजिक भुमिकेतुन मदत कार्य करत आहेत.आजच्या शिवसेनेच्या सत्तेच्या सोपानास मा.बाळासाहेब ठाकरेंचे विचार व कार्य यातुनच चालना मिळाली आहे.


यावेळी पुणे शिवसेना सह-संपर्कप्रमुख प्रशांत बधे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, नगरसेवक बाळा ओसवाल, राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख अमोल रासकर, सचिन देडे युवराज शिंगाडे, राजू विटकर, चंदन साळुंके, कमलेश मानकर, महिला आघाडीच्या सुषमा तळेकर, श्रुती नाझरीकर, सुरेंद्र चिकणे, अरुण पापळ, ऋषभ नानावटी, सुभाष धेंगले, सुधीर शेळके, प्रशांत लोंढे आदी शिवसैनिक उपस्थित होते.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image