पुणे विभागातील 4 लाख 74 हजार 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी*        *विभागात कोरोना बाधित 5 लाख 6 हजार 887 रुग्ण*                                      *-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**


  पुणे,दि.04 :- पुणे विभागातील 4 लाख 74 हजार 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 6 हजार 887 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 553 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 199 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.54 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हा


  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 25 हजार 212 रुग्णांपैकी 3 लाख 5 हजार 945 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 404 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 863 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.08 टक्के आहे. 


सातारा जिल्हा 


   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 932 रुग्णांपैकी 42 हजार 680 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 684 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


सोलापूर जिल्हा


    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 78 रुग्णांपैकी 37 हजार 440 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


  सांगली जिल्हा


               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 394 रुग्णांपैकी 42 हजार 369 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 375 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा


  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 271 रुग्णांपैकी 45 हजार 701 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 924 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 646 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 9 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 546, सातारा जिल्ह्यात 157, सोलापूर जिल्ह्यात 184, सांगली जिल्ह्यात 74 तर कोल्हापूर जिल्ह्यात 48 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण -  


पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 623 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 680 ,सातारा जिल्हयामध्ये 546, सोलापूर जिल्हयामध्ये 137, सांगली जिल्हयामध्ये 217 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 43 अशा रुग्णांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 31 हजार 838 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 6 हजार 887 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 


( टिप :- दि. 3 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


                         *****