माथेरान मधील मुजोर पोलिसांवर निलंबनाची कारवाई.... कर्जत दि 24 गणेश पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



माथेरान मधील मुजोर पोलिसांवर निलंबनाची कारवाई


कर्जत दि 24 गणेश पवार


माथेरान मधील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष व येथील व्यावसायिक बिलाल महाबळे तसेच पत्रकार दिनेश सुतार याला येथील मुजोर पोलीस श्याम जाधव यांनी मध्यधुंद अवस्थेत शिवीगाळ तसेच मारहाण केल्या प्रकरणी रायगड जिल्हा अधिक्षक यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.


                  20 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30 वाजता ठाणे अंमलदार असताना पोलीस नाईक शाम जाधव मध्यधुंद अवस्थेत हे बिलाल महाबळे यांच्या दुकानांमध्ये गेले दुकान बंद असताना देखील शाम जाधव यांनी पान दे असे सांगितले.त्यावर बिलाल यांनी दुकान बंद आहे पान हे बनवावं लागेल.सर्व सामान भरलं आहे त्यामुळे मी पान देऊ शकत नाही.तुम्हाला दुसरं काही हवं असेल तर दुकान उघडून देतो यावर पारा चढलेल्या जाधव यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत भर बाजारात पोलीस काठीने मारहाण केली.यावर बिलाल यांनी पोलिसात तक्रार करताच फिर्यादी बिलाल महाबळे व पोलीस नाईक शाम जाधव यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नगरपालिका रुग्णालयात जात असताना पत्रकार दिनेश सुतार हे वार्तांकन करण्यासाठी गेले असताना त्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली तसेच मारहाण देखील केली.याबाबत दिनेश सुतार यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आणि याला जिल्ह्यातील रायगड प्रेस क्लब तसेच मराठी पत्रकार परिषदेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संबंधित मुजोर पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली.रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पेरणे यांनी हे प्रकरण लावून धरले.प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे यांनी याला दुजोरा देत पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाही असे सांगितले.


                  यावर येथील पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी याची गंभीर दखल घेत पुढील आदेश मिळे पर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी तसेच रायगड प्रेस क्लब ने समाधान व्यक्त करत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे आभार मानले आहेत.                 


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image