एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिट ,पुणे, भारततर्फे रौप्य महोत्सवी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला ऑनलाईन 24 नोव्हेंबरपासून (मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर ते सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2020)

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिट ,पुणे, भारततर्फे


रौप्य महोत्सवी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला ऑनलाईन 24 नोव्हेंबरपासून


(मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर ते सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2020)


पुणे, दि. 22 नोव्हेंबर : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर ते सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत 25वी म्हणजे रौप्य महोत्सवी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.


 या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता होणार आहे. केंद्रीय ग्रामिण विकास राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.


तसेच, ग्लोबल मास्टर ऑफ हार्टफुल्लनेसचे माननीय कमलेश पटेल (दाजी), श्री अरबिंदो फाउंडेशन फॉर इंडियन कल्चर ऑन लाईफ टिचिंग फॉम द सिके्रट टेक्स ऑफ इंडियाचे संचालक डॉ. संपदानंद मिश्रा, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू व जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सम्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.


सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या समारंभासाठी प्रेम शक्ती पीठचे संस्थापक अध्यात्मिक गुरू साध्वी ऋतूंभरा , बीजेपीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती, आरोग्य राज्य मंत्री डॉ. राजेंद्र पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, टेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे हे आणि यूएसए येथील शास्त्रज्ञ अशोक जोशी व जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ गुरुचरण दास हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


अध्यक्ष स्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.


दि. 25 ते 29 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होणार्‍या व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सर्वश्री सुरेश जोशी (भैय्याजी जोशी), इस्त्रोचे माजी अध्यक्ष ए.एस. किरण कुमार, अक्षरधाम येथील प्रेरक वक्ता व अध्यात्मिक गुरू डॉ. गणवस्तल स्वामी बीएपीएस, सातारा येथील प्रेरक वक्ता प्रा.नितिन बालगुडे पाटील, राज्य सभेचे सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, भारतीय मुस्लिम मंचाचे प्रमुख इंद्रेश कुमार, अध्यात्मिक गुरू श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे, जीवन विद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै, महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सिताराम कुंटे, जळगाव येथील जैन एरिकेशनचे अतुल भंवरलाल जैन, पुणे येथील ज्वाइंट कमिशन्सर डॉ. रविंद्र शिसवे, लोक बिरादरी प्रकल्पचे संस्थापक व सामाजिक सेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाताई आमटे ,भारतीय कॉर्डीयोलॉजी ऑफ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जगदीश हिरेमठ, मुंबई येथील आयआयटीचे पद्मश्री डी.बी. फाटक इ.मान्यवरांसह अनेक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आपले विचार व्यक्त करतील.


प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम हे या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये दि. 25 नोव्हेंबर ते दि. 29 नोव्हेंबर 2020 पर्यंत माईर्स एमआयटी संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी ऑनलाईन योगासन वर्गाचेही आयोजन केले आहे. योगासन वर्ग आयोजित करणारी माईर्स एमआयटी, पुणे ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे.


‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.


या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे.


ही ऑनलाईन व्याख्यानमाला विनामूल्य असून ती सर्वांसाठी खुली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, अशी संयोजकांची अपेक्षा आहे.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून 25 वर्षापूर्वी या व्याख्यानमालेची सुरूवात झाली. गेल्या 25 वर्षात या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील ५०० मान्यवरांनी आपले विचार मांडून मार्गदर्शन केले. याचा फायदा संस्थेतील कर्मचारी व इतर नागरिकांना होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांचा सर्वांगीण विकास झाला आहे.


अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा. डॉ.मिलिंद पांडे , कुलसचिव डॉ. प्रशांत दवे आणि श्री. रवींद्रनाथ पाटील यांनी दिली.