पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*
पुणे :- पिसोळीच्या खरटमल कुटुंबाने जपलाय चित्रपट, नाट्य सृष्टीचा १०० वर्षाचा इतिहास जपला आहे .सिने स्टार अमिताभ बच्चन यांचा सिने जगतातील झालेला प्रवास रेकॉर्ड्स प्लेयर्सचा संग्रहकेला आहे . लष्करी सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी नामदेव खरटमल यांनी मागील २० वर्षांपासून तब्बल १०० वर्षांचा हिंदी मराठी इंग्लिश चित्रपट,नाट्य,भाव गीत,कोळीगीत,पोवाडा,भक्ती संगीत,भजन,गझलयांचा इतिहास रेकॉर्ड्समधून जपला आहे. सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला करण्यात आला . यावेळी त्यांनी या आगळ्या वेगळ्या संग्रहालयाची माहिती दिली.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित विशेष सादर केलेल्या या संग्रहात बच्चन यांचा वो सात दिन चित्रपटापासून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो,बच्चन यांचे गाजलेले चित्रपट,त्यातील संवाद यांच्या रेकॉर्ड्स उत्तम अवस्थेत पाहायला मिळतात आणि आपण चकित होतो.
खरटमल यांचे चिरंजीव नयन आणि मयूर व स्वप्नील यांनी देखील वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. अतिशय दुर्मिळ अशा सिने,नाट्य क्षेत्रातील चित्रपट, नाटक यांच्या तब्बल पाच हजार रेकॉर्ड्स खरटमल यांच्या संग्रहालयात आहेत,ज्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही..!
इंग्रजांच्या काळापासून आलेले तबकडीचे ग्रामोफोन,रेडिओ टेपरेकॉर्डस,तर नवीन जमान्यातील सिडी प्लेयर्स यांचा संग्रह देखील खरमटल यांच्याकडे आहे,आणि तो अतिशय उत्तम स्थितीत आहे. खरटमल यांच संगीत-चित्रपट यांचं रेकॉर्ड्स संग्रहालय पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून संगीत प्रेमी मंडळी येत आहेत.
लष्करी खात्यात नोकरी करत जमवलेला हा खजिना प्रत्येकाने पहावयास हवा असाच आहे पाहूया खरटमल कुटुंबाचे हे अजब सिने,नाट्य,संगीताचे प्रेम आणि त्यांनी सिने स्टार अमिताभ बच्चन यांना त्यांनी बच्चन यांचा सिने जगतातील झालेला प्रवास रेकॉर्ड्स प्लेयर्सचा संग्रह सादर करून दिलेल्या या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत .