पिंपरीत सक्रिय रुग्णसंख्येत घट ; करोनामुक्तांची संख्या वाढली...डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


..


 पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी जवळपास चार हजार सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ लागल्यानंतर ११ मार्चला शहरात करोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करोनाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यात करोनाचे दररोज हजार ते बाराशे नवे रुग्ण आढळून येत होते. मात्र ऑक्टोबरमध्ये परिस्थिती सुधारली. एक ऑक्टोबरला ६३३, दोन ऑक्टोबरला ६२४, तीन ऑक्टोबरला ५९८, चार ऑक्टोबरला ५५४, पाच ऑक्टोबरला ४४३, सहा ऑक्टोबरला ४४९, सात ऑक्टोबरला ५७०, आठ ऑक्टोबरला ५६१, नऊ ऑक्टोबरला ४९०, १० ऑक्टोबरला ४४०, ११ ऑक्टोबरला ३५२, बारा ऑक्टोबरला २४६ अशी रुग्णसंख्या होती. तुलनेने नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. उपचारानंतर बरे झालेल्यांचे दररोजचे प्रमाणही वाढल्याचे दिसते. एक ऑक्टोबरला १,११८, दोन ऑक्टोबर – ९३२, तीन ऑक्टोबर- ७४३, चार ऑक्टोबर – ६४७, पाचला ८३३, सहाला ८८३, सातला ६६४, आठला ७१३, नऊ ऑक्टोबर –  ४७४, १०ऑक्टोबर – ५२९, अकरा ऑक्टोबर – ३८३ आणि १२ ऑक्टोबरला ६०९ रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे.


 नागरिकांनी यापुढेही खबरदारी बाळगावी. शासकीय नियमांचे पालन करावे. 


संतोष पाटील, 


अतिरिक्त आयुक्त, पिंपरी पालिका 


आजमितीला नवे रुग्ण कमी होत चालले आहेत, ते पुन्हा वाढणारच नाहीत, असे नाही. करोनाचा संसर्ग टळलेला नाही. 


नागरिकांनी यापुढेही काळजी घेतली पाहिजे.


  डॉ. पवन साळवे,


 आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी पालिका