मृत्यूपुर्वी सुशांतने रियाची भेट घेतली होती”;  श्वेता सिंह किर्तीचा खळबळजनक दावा.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


“मृत्यूपुर्वी सुशांतने रियाची भेट घेतली होती”; 


श्वेता सिंह किर्तीचा खळबळजनक दावा.....


मुंबई :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत.


 सी.बी.आय. आणि एन.सी.बी.च्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने या प्रकरणातील मुख्य आरोपी रिचा चक्रवर्तीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. १३ जून रोजी रियाने सुशांतची भेट घेतली, होती असा खळबळजनक दावा तिने केला आहे. 


“जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या केली”; बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप १४ जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला. परंतु मृत्यूपुर्वी १३ तारखेला रियाने सुशांतची भेट घेतली होती असा दावा श्वेताने केला आहे. “ही खऱ्या अर्थाने एक गेमचेंजर ब्रेकिंग न्यूज आहे. एक साक्षिदार आहे ज्याने रियाला सुशांतची भेट घेताना पाहिलंय. 


१३ जून रोजी नेमकं असं काय घडलं होतं? 


ज्यामुळे १४ तारखेला माझ्या भावाचा मृत्यू झाला.” अशा आशयाचं ट्विट श्वेताने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 


भूमी पेडणेकर म्हणते, “…तर हा अभिनेता असता ‘सेक्स उपचार तज्ज्ञ’ अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली असून तिला मे.‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एन.सी.बी.’ने केला. ‘एन.सी.बी.’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते.