शहरात लेप्टोचे १५ रुग्ण ; मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रणात.......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


शहरात लेप्टोचे १५ रुग्ण ;


मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रणात.......


 मुंबई : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या अकरा दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे १५ रुग्ण शहरात आढळले आहेत. 


शहरातील हिवतापाचा जोर मात्र गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत बराच कमी झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून निदर्शनास येते. 


धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची आत्तापर्यंत तीन ते चार वेळा ‘तुंबई’ झाली आहे. 


पाणी साचून राहात असल्याने लेप्टोच्या रुग्णांचे प्रमाणही हळूहळू वाढले. 


जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्या १४, ४५ आणि ५४ अशी उत्तरोत्तर वाढत गेली आहे. 


तसेच सप्टेंबरमध्ये एका मृत्यूचीही नोंद झाली आहे. 


गेल्या वर्षाच्या तुलनेत लेप्टोच्या रुग्णांची आणि मृतांचे प्रमाण कमी आहे. 


गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या महिन्यात ३० लेप्टोचे रुग्ण आढळले होते आणि एक मृत्यू झाला होता. 


परंतु यावर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या दहा दिवसांत निम्मे म्हणजेच १५ रुग्ण आढळले आहेत. 


मृत्यूची नोंद मात्र शून्य आहे. 


जून-जुलैमध्ये शहरात पसरलेल्या मलेरियाच्या प्रादुर्भावात गेल्या काही महिन्यांत घट झाली आहे. 


सप्टेंबरमध्ये मलेरियाचे ६६१ रुग्ण आढळले होते.


 ऑक्टोबरच्या पहिल्या दहा दिवसांत १६० रुग्णांची नोंद झाली आहे. 


अन्य पावसाळी आजारांचे प्रमाण कमीच डेंग्यू, स्वाइन फ्लूसह अन्य पावसाळी आजारांचे प्रमाण ऑक्टोबरमध्येही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी नोंदले आहे. 


लेप्टोचा संसर्ग होऊ नये यासाठी ही काळजी घ्या प्राण्याचे मलमूत्र मिसळेले पाणी किंवा जमिनीशी शक्यतो संपर्क टाळावा. 


पावसामुळे तुंबलेल्या पाण्यामध्ये चालत गेलेल्या नागरिकांनी ७२ तासांच्या आत जवळच्या पालिका दवाखान्यातून किंवा रुग्णालयातून लेप्टोची प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*