भयंकर!  घरातून पळालेल्या १७ वर्षीय मुलीवर २२ दिवस सामूहिक बलात्कार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


.....


उत्तर प्रदेश :- आईवडिलांशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडलेल्या १७ वर्षीय मुलीवर २२ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 


घरी नेऊन सोडतो म्हणत आरोपीनं बस स्थानकासमोरून मुलीचं अपहरण केलं. 


त्यानंतर शेतातील घरात डांबूर ठेवत तिच्यावर २२ दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आला. 


देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे.


 उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना चर्चेत असतानाच ओडिशातील कटकमध्ये आणखी एक सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. 


जगतसिंगपूर जिल्ह्यातील तिर्टोल येथील एका १७ वर्षीय मुलीचा आईवडिलांशी वाद झाला होता. 


भांडण झाल्यानंतर मुलगी घरातून निघून गेली होती. 


ओ.एम.पी. चौकातील बस स्थानकासमोर तिला एक व्यक्ती भेटला.


 तुला घरी सोडतो म्हणत तिला घेऊन तिर्टोलच्या दिशेनं निघाला. 


मात्र, तिर्टोल जाण्याऐवजी मध्येच तो तिला गतीरौटपटना गावातील एका पोल्ट्री फॉर्मवर घेऊन गेला. 


तिथे एका खोलीत तिला डांबून ठेवलं.


 त्यानंतर दोन व्यक्तींनी तिच्यावर २२ दिवस अत्याचार केला. 


ग्रामस्थांना संशय आल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली.


 माहिती कळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी पोल्ट्री फॉर्म धाड टाकली. 


त्यानंतर अपहरण केलेल्या मुलीची सुटका करण्यात आली.


 एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्याचा शोध सुरू केला आहे.


 फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं तयार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


त्याचबरोबर पीडित मुलीला जिल्हा बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आलं. 


त्यानंतर तिला अनाथश्रमात पाठवण्यात आलं आहे.