दोन वेळच्या अन्नाची भ्रांत,  गरिबीला कंटाळून आईनेच घेतला सहा वर्षाच्या चिमुरडीचा जीव..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, 


गरिबीला कंटाळून आईनेच घेतला सहा वर्षाच्या चिमुरडीचा जीव.....


उत्तर प्रदेश :-  आर्थिक संकटात अडकल्याने तसंत दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थाही करु शकत नसल्याने आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


 उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला असून याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. 


टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महिलेला अजून दोन मुलं असून मुलीच्या भविष्याची चिंता तिला सतावत होती. 


महिलेला भविष्यात मुलीच्या लग्नाचा खर्च कसा उचलणार याची काळजी लागली होती. 


उषा देवी असं या महिलेचं नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. 


याशिवाय दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थाही ते करु शकत नव्हते. 


मजूर असणाऱ्या पतीच्या अपघातानंतर महिलेवर कुटुंबाची जबाबदारी आली होती. 


महिलेचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 


पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या