आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते किशोर हातागळे यांची कामगार आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते किशोर हातागळे यांची कामगार आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे


पिंपरी :-भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पदी किशोर हातागळे यांची नियुक्ती


- भाजप शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र 


- संघटीत कामगारांसोबत असंघटित कामगारांच्या हितासाठी भरीव काम करणार असल्याचे हातागळे यांचे आश्वासन


पिंपरी दि.०४ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. भाजप शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे 


       किशोर हातागळे यांनी या अगोदर बांधकाम कामगारांसाठी हजारो असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनेचा लाभ देत कामगार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, याचबरोबर निगडी भाजप अध्यक्ष ही जबाबदारीही त्यांनी पार पाडली असुन शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता.


       कोरोना महामारीमुळे संघटित व असंघटित कामगारांनावर बेरोजगाराची व उपासमारीची वेळ आहे सध्या कामगार हा खुप अडचणीत असुन भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या माध्यमातुन कामगारांच्या न्याय व हक्कासाठी भरीव काम करणार असल्याचे मत नवनिर्वाचित सरचिटणीस किशोर हातागळे यांनी व्यक्त केले. 


यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार, नगरसेवक तथा भाजप कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस केशव घोळवे, भाजप प्रदेश सरचिटणीस प्रिती व्हिक्टर, भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे हे उपस्थित होते.