रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाची आढावा बैठक संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


*


रायगड :- जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाची आढावा बैठक उरण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात संपन्न झाली या वेळी बैठकीस प्रभारी म्हणून प्रथम आल्या मुळे उरण जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांच्या हस्ते तसेच उरण शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अक्षय पाटील सेवा दल शहर अध्यक्ष शैलेश तामगाडगे, महिला रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ संध्याताई ठाकूर, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते जे. डी. पाटील, ओ. बी. सी. विभाग तालुका अध्यक्ष उमेश भोईर यांच्या उपस्थित माझा सत्कार करण्यात आला या नंतर अनु. विभागाच्या एल. टी. लव्हे यांची उरण तालुका अध्यक्ष अनु जाती विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या सह रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना माझ्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या नंतर माझ्या अध्यक्षतेखाली अनु जाती विभागाची प्रमुख पाधिकाऱ्यांसह पार पडली या वेळी रायगड जिल्हा अनु जाती विभागाचे अध्यक्ष अँड. निलेश मर्चंटे यांनी प्रास्ताविक केले यानंतर मार्गदर्शन करताना भाजप शासित प्रदेशांमध्ये दलितांवर वाढलेले आत्याचार धनदांडग्या साठी पारित केलेला शेतकरी विरोधी कायदा त्याच प्रमाणे गाव तिथे काँग्रेस ची शाखा अभियान तसेच रायगड जिल्ह्यातील नगर परिषद वॉर्ड, जिल्हापरिषदेचे गन तसेच पंचायत समितीचे वॉर्ड या मध्ये लवकरात लवकर जिल्हा कमिट्या, वॉर्ड कमिट्या व विधानसभा सभा कमिट्या यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकर करण्यात याव्या असे आदेश देण्यात आले रायगड जिल्ह्यातील विविध समस्या तसेच भाजप च्या वाढत्या जातीय अत्याचाराच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचे सांगितले तसेच शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात गाव व खेड्यात पदाधिकाऱ्यांनी जनजागृती करावी असे सांगितले काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगते ऐकून घेतल्या नंतर हथरस येथील जातीय अत्याचाराला बळी पडलेल्या मनीषा वाल्मिकीला श्रद्धांजली वाहून एल. टी. लव्हे यांनी आभार मांडून सभा समाप्त झाली...


कार्यक्रमाचे आयोजन रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनु जाती विभागाचे अध्यक्ष अँड. निलेश मर्चंटे यांनी केले या वेळी रायगड जिल्ह्यातील प्रमुख महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते