दलित पॅंथर ऑफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी सरकारचा निषेध करून, पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रतिकात्मक प्रतिमेस बांगड्या भरून जोडे मारो आंदोलन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


उत्तर प्रदेशमधील मनिषा वाल्मिकी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी सरकारचा निषेध करून प्रतिकात्मक प्रतिमेस बांगड्या भरून जोडे मारो आंदोलन


दलित पॅंथर ऑफ इंडियाच्यावतीने उत्तर प्रदेश मधील वाल्मिकी समाजातील मनिषा वाल्मिकी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले . यावेळी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना दलित पॅंथर ऑफ इंडियाच्यावतीने शिष्टमंडळाने दिले . यावेळी उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी सरकारचा निषेध करून प्रतिकात्मक प्रतिमेस बांगड्या भरून जोडे मारो आंदोलन करण्यात आले .


मनिषा वाल्मिकीवर चार सुवर्ण ठाकूर यांनी गॅंगरेप करून तिची जीभ कापण्यात आली . तिच्या शरीरावर अत्याचार करण्यात आला . तिच्यावर वैद्यकीय उपचार व्यवस्थित करण्यात आले नाही . त्यातच तिचा मृत्यू झाला . पुरावे नष्ट करण्याकरिता तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यामुळे संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी . अशी मागणी दलित पॅंथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी केली .


या आंदोलनात दलित पॅंथर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख , पुणे शहर अध्यक्ष महादेव गायकवाड , पुणे जिल्हा अध्यक्ष संघराज गायकवाड , महिला आघाडी अध्यक्षा द्रौपदी पाटील , आशिष भंडारे , वंदना दरपेल्ली , योगेश ओव्हाळ , जाहीर शेख , परवेज शेख , साहिल शेख , अशरफ शेख , शाहरुख पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते .