कर्जत तालुका आदिवासी समाज हा शेतीवर अवलंबून आहे भातशेतीचे नुकसान परतीच्या पावसाने तोंडशी आलेला घास मातीत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कर्जत दि.19 गणेश पवार


                       कर्जत तालुक्यात 


 बहुसंख्य भाग हा आदिवासी भाग आहे. या भागातील आदिवासी समाज हा शेतीवर अवलंबून आहे.   


        तर या आदिवासी भागात आवकाळी पाऊसाने प्रचंड प्रमाणात नुसकान केल आहे. व त्या शेतकऱ्यांचे पंचनामा करून त्यांना त्वरीत मदत मिळावी अशी मागणी आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत यांच्या वतीने मागणी करण्यात आली. 


                       आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जतच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयात निवेदन देऊन मागणी करण्यात आली. 


    याप्रसंगी आदिवासी ठाकुर समाज संघटना अध्यक्ष भरत शिद, रायगड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मालु निरगूडे, कर्जत संघटना उप अध्यक्ष परशुराम दरवडा, उप अध्यक्ष मंगळ केवारी, माझी अध्यक्ष जैतू पारधी सचिव मोतीराम पादिर प्रकाश केवारी, शिवाजी सांबरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.