सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर २०२० रोजी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे, दिनांक २६ ऑक्टोबर २०२० : 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी व दिनांक २८ जून २०२० रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कोविड - १९ महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. सदर परीक्षा दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेबाबतची माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.