पुणे पोलीस आयुक्तांनी केलेलं ते विधान चुकीचं  अजित पवार.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



(पुणे प्रतिनिधी),


  पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी बद्दल शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एक विधान केले आहे की, करोनामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यातून गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहे. असे म्हटले असून अशा प्रकाराचे विधान एखाद्या कायदा सुव्यवस्था राखणार्‍या अधिकार्‍यांने करणे चुकीचे असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. तसेच शहरातील सध्याच्या परिस्थितीवर पुणे महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहरात खुनाच्या आणि इतर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. त्या प्रश्नावर अजित पवार यांनी भूमिका मांडली.यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे शहर आणि जिल्ह्यात करोना परिस्थितीवर प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. या कामात प्रशासन, डॉक्टर, पोलीस आणि पत्रकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. यामध्ये पत्रकार करोना बाबत प्रत्येक वेळी नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहे. ही कौतुकाची बाब असल्याचे सांगितले. पण मी आज प्रवासा दरम्यान पुण्यात काही ठिकाणी पाहिले. तर अद्याप ही नागरिक मास्क वापरत नाही. हे पाहून चिंता वाटत असून पोलीस विभागा मार्फत मास्कचा वापर न करणार्‍या व्यक्तीच्या कारवाईचा आढावा आज घेतला. त्यामध्ये जिल्ह्यात तब्बल ११ कोटी रुपये जमा झाले आहे. यातून एकूणच जिल्ह्याची परिस्थिती लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image