मोरया गोसावी देवस्थानला ; तीर्थक्षेत्राचा दर्जा' द्यावा*.....  *खासदार श्रीरंग बारणे*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*'


*चिंचवड:-* चिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानाला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे बुधवारी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.


खासदार बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, स्थानिक नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या शिष्टमंडळाने दोन्ही मंत्र्यांची भेट घेऊन व' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी केली. बारणे म्हणाले, 'चिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचा इतिहास साडेचारशे वर्षांपूर्वीचा आहे. मोरया


गोसावी देवस्थानांतर्गत अष्टविनायक क्षेत्रांपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक यांचा समावेश होतो. या तिन्ही ठिकाणचा कारभार गोसावी देवस्थानमार्फत होते. अष्टविनायकाची यात्रेच्या सुरुवातीला किंवा शेवटी चिंचवड देवस्थानातील गणपतीचे दर्शन भाविक आवर्जुन घेतात. तशी आख्यायिका देखील आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्थानाला जमिनी दिल्याची नोंद आहे. त्यामुळे या देवस्थानाला धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व आहे.


बारणे यांनी सांगितले, की तीर्थक्षेत्राला 'ब' दर्जा देण्यात यावा. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर सरकारच्या पर्यटनाच्या आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्रात चिंचवड देवस्थानचा समावेश केला जाईल. त्यामुळे विकासकामांना चालना मिळेल. 


चिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानाला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत दिलेल्या निवेदनास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


श्रीरंग बारणे, खासदार