पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मा. संपादक,
दैनिक :
आपल्या लोकप्रिय दैनिकात/साप्ताहिकात प्रसिद्धीस द्यावे हि विनंती..
व*
महोदय,
पुणे महानगरपालिकेचा सध्या "अजब कारभार, गजब कहाणी" अश्या पद्धतीने कारभार सुरु आहे असे म्हणण्यास काही हरकत नसावी.
कंत्राटी सफाई कामगार आमच्या माहिती नुसार ४००० च्या आसपास असावेत. त्यांचे गेल्या ४ महिन्याचे वेतन थांबवण्यात आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज करोना सारख्या महामारीत सुध्दा जीवावर उदार होऊन सफाई कामगार महिला आपली सेवा बजावत आहेत, त्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे म्हणूनच ते सफाई काम करत आहेत, त्यांना घरभाडे भरायला सुध्दा पैसे जवळ नाहीत. त्यांना त्यामुळॆ आर्थिक अडचणीं सामना करावा लागत आहे.
जर त्यांनी ८ दिवसासाठी काम बंद ठेवले तर आपल्याला रस्त्यावर फिरणे सुध्दा मुश्किल होईल. पुणे महानगरपालिकेची एवढी विकास कामे चालू आहेत परंतु या सफाई कामगारांना पगार मनपा करू शकत नाही तर या विकास कामांचा काय उपयोग??
आज बुधवार दिनांक १४/१०/२०२० रोजी सकाळी प्राथमिक स्वरूपात औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त जयदीप पवार साहेब यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून सगळी माहिती दिली आहे. त्यांनी ८ दिवसात त्यांचे वेतन देण्याचा शब्द आम्हास दिला आहे. तरी आपण लवकरात लवकर कंत्राटी कामगारांचे चार महिन्यांचे वेतन द्यावे हि विनंती.
जर येत्या ८ दिवसात सफाई कामगारांचे वेतन झाले नाही तर पुणे महानगरपालिकेला या कामगार व मनसे कार्यकर्त्यांना घेऊन घेराव घालण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस आपण जबाबदार असाल याची आपण नोंद घ्यावी. अशाप्रकारचे निवेदन आज बुधवार दिनांक १४/१०/२०२० रोजी पुणे महापालिका आयुक्त साहेब, महापौर, यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुहास निम्हण, प्रभाग अध्यक्ष निलेश जुनवणे, संगमवाडीचे शाखाध्यक्ष मुकेश खांडरे, व असंख्य कंत्राटी कामगार व मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार्य असावे,
कळावे,
आपला राष्ट्रबांधव,
सुहास भगवानराव निम्हण
(अध्यक्ष : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)