मद्यालये रात्री नऊ तर दुकाने आठपर्यंत खुली...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल उपमुख्यमंत्री


मद्यालये रात्री नऊ तर दुकाने आठपर्यंत खुली...


नाशिक : टाळेबंदीचे निर्बंध शिथील करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असून त्या अंतर्गत शहरातील सर्व दुकाने रात्री आठपर्यंत तर, हॉटेल आणि मद्यालये रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. दुकानांमध्ये मुखपट्टीविना ( मास्क )ग्राहक आल्यास त्यास माल विक्री करू नये, अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकमध्ये करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे नमूद केले. करोनाच्या नियमावलीचे पालन करून हळूहळू सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. अलीकडेच शासनाने हॉटेल, मद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. त्यांची वेळमर्यादा वाढविण्यात आली आहे. प्रशासनाने सकाळी सात ते सायंकाळी सात ही वेळ निश्चित केली होती. परंतु, ती गैरसोयीची असल्याने अनेक मद्यालय चालकांनी ती वाढवून देण्याची मागणी केली होती. बैठकीत या मुद्यावर चर्चा होऊन सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. शहरातील अन्य दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यास वेळ वाढवून देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय रात्री आठपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही त्याचा लाभ होईल. दुकाने खुली ठेवण्याचा कालावधी वाढविला गेला असला तरी दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची जबाबदारी व्यावसायिक, व्यापाऱ्यांची आहे. ग्राहकाने मुखपट्टी ( मास्क )परिधान केली नसल्यास त्याला मालाची विक्री करू नये. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित दुकानदाराविरोधात कारवाई करण्यात येईल.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image