यशस्वी' संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी.मे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पिंपरी : दिनांक : २ ऑक्टोबर २०२० : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस)चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी आपल्या मनोगतात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त आढावा घेत आजही त्यांचे कार्य व विचार सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत असे सांगितले. यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनीषा खोमणे यांच्यासह मोजक्याच संख्येने अध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. महेश महांकाळ यांनी केले. 


फोटो ओळ : 1)'यशस्वी'संस्थेच्यावतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस) चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे .


२) 'यशस्वी'संस्थेच्यावतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेले खुर्चीवर मध्यभागी बसलेले यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस) चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे,संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनीषा खोमणे यांच्यासह अन्य अध्यापक व इतर कर्मचारी वर्ग.