मेहेतर वाल्मिकी समाज पुणे शहरच्यावतीने मनिषा वाल्मिकी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीकरिता

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 पुणे :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाल्मिकी समाजातील महिलांनी धरणे आंदोलन


मेहेतर वाल्मिकी समाज पुणे शहरच्यावतीने उत्तर प्रदेश मधील वाल्मिकी समाजातील मनिषा वाल्मिकी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाल्मिकी समाजातील महिलांनी धरणे आंदोलन केले


 उत्तर प्रदेश मधील वाल्मिकी समाजातील मनिषा वाल्मिकी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले . यावेळी वाल्मिकी समाजातील महिला मंडळाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन दिले .


मनिषा वाल्मिकीवर गॅंगरेप करून तिची जीभ कापण्यात आली . तिच्या शरीरावर अत्याचार करण्यात आला . तिच्यावर वैद्यकीय उपचार व्यवस्थित करण्यात आले नाही . त्यातच तिचा मृत्यू झाला . पुरावे नष्ट करण्याकरिता तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यामुळे संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी . अशी मागणी माजी नगरसेविका मिना रवी परदेशी व नगरसेविका गीता मंचरकर यांनी केली .


या धरणे आंदोलनात नीलम महेंद्र लालबिगे , कमल दिगंबर चव्हाण , उषा अर्जुन साळुंके , शारदा राजू मुलतानी , साधना सुनील चव्हाण , रजनी देविदास शिकोत्रे व मोठ्या संख्येने समाजातील महिला सहभागी झाल्या होत्या .