बँक ऑफ महाराष्ट्रकडून घरपोच सेवा उपलब्ध

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रसिद्धीसाठीपुणे दि. ८ ऑक्टोबर २०२०: देशात सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ५५५ शाखाद्वारे १०० केंद्रांतून घरपोच बँकिंग सेवा (DSB) उपलब्ध केली आहे.


सध्या बँकेने घरपोच सेवेमध्ये वित्तेतर बँकिंग सेवा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये पुढील गोष्टी ग्राहकांकडून गोळा केल्या जातील. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स (चेक/ड्राफ्ट/पे ऑर्डर इ.) 15G/15H प्रपत्रे, नवीन चेकबुकसाठी मागणीपत्र, स्थायीसूचना अर्जाचे प्रपत्र, खाते स्टेटमेंट, टीडीएस/फॉर्म १६ सर्टिफिकेटसाठी अर्ज इ. गोष्टींचा यात समावेश आहे. तसेच खाते स्टेटमेंट, टीडीएस/फॉर्म १६ सर्टिफिकेट, अव्यक्तिगत चेकबुक, मुदत ठेव पावती इ. गोष्टी ग्राहकांना दिल्या जातील.


श्री हेमंत टम्टा, कार्यकारी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सांगितले की DSB मुळे ग्राहकांना वित्तेतर सेवांचा लाभ घरपोच घेण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध होईल. विशेषत: कोव्हिड १९ च्या साथीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजन यांनी DSB चा वापर करून बँक शाखांमध्ये जाणे टाळावे.


EASE 2.0 सुधारणांच्या अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या घरी बँकिंग सेवा मिळण्यासाठी वैश्विक स्पर्श बिंदू (कॉल सेंटर, वेब पोर्टल किंवा मोबाइल ॲप) द्वारा DSB मुळे सहज सेवा प्राप्त होईल. या माध्यमांतून ग्राहकांना त्यांच्या सेवा विनंतीचा पाठपुरावा करता येईल. DSB सेवा उपलब्ध करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांची यादी www.bankofmaharashtra.in या बँकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.