राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने विविध क्षेत्रातील नऊ दुर्गांचा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सन्मान.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने नवरात्र उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये विशेषतः पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा व युवतींचा (९ दुर्गांचा) या निमित्ताने साडी- चोळी , पुस्तक, शाल तसेच श्रीफळ देऊन सन्मान केला.श्री. संजोग वाघेरे पाटील (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), युवा नेते विरेंद्र बहल,राखी धर ,अपर्णाताई मिसाळ,गंगताई धेंडे, कविता खराडे, पल्लवीताई पांढरे इ.च्या हस्ते केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षा जगताप, रूतुजा बिराजदार, गीता मोरे, शलाका बनकर, हिना अत्तार, स्नेहल लायगुडे, नयन पाटील, आदि युवती उपस्थिती होत्या. 


सत्कारार्थींची नावे खालीलप्रमाणे:


1. आशा साळवी (पत्रकार)


2. डाॅ.पौर्णिमा कोल्हे (शिक्षण क्षेत्र)


3. डाॅ. तेजश्री कपोते ( डाॅक्टर)


4. रेश्मा गायकर ( ट्रॅफिक पोलिस )  


5. रूतुजा साबळे ( नर्स)


6. अश्विनी बंसल (वकिल)


7.स्नेहल ढोरे ( व्यवसाय)


8.रेणुका कांबळे ( सफाई कर्मचारी)


9. सुनिता मुदलियार ( घरकाम).