*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
(नई दिल्ली) पुणे विभाग यांचे वतीने, हाथरस पिडीत मुलीला न्याय मिळावा म्हणून कॅन्डल मोर्चाचे आयोजन संपन्न
**
*पुणे :-* केन्द्रीय मानवाधिकार संगठन (नई दिल्ली) पुणे विभाग, यांचे
शहर अध्यक्ष संजय थोपटे (पुणे शहर अध्यक्ष ) व छाया ख़ैरनार,छावा क्रांतिवीरसेना,युवा प्रदेश अध्यक्ष महिला आघाड़ी,केन्द्रीय मानवाधिकार(महाराष्ट्र राज्य सचिव संघटक)-यांच्या मार्गदर्शनाखाली कर्वेनगर पुणे - 52 येथे , शांततेत मध्ये हाथरस च्या पिडीत मुलीला श्रध्दांजली वाहण्यासाठी कैंडल मार्च अनुसंघाने, सदर घटनेची नोंद घेऊन करुण भावनेने श्रद्धांजली समर्पित केली असून, आमचे सहभागी सहकार्य सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी बानखीले , दिपक चव्हाण , यासीन पठाण, निलेश काळे सौ. शोभा तिवारी यांच्या उपस्थितीमध्ये केंडल मार्च पार पडला असून, ह्या महाराष्ट्र सरकार ला व केंद्र सरकारला आम्ही विनंती करू इच्छितो की राज्यसभा, लोकसभा - विधान सभा यांचा बराच काळ चहा - पाण्यासाठी राखीव ठेवला आहे असे कळते. परंतु, निर्भया प्रकरणा नंतर केद्र सरकारने नवीन कायद्यांची
अंमल बजावणी केली असताना देखील, त्याच्या शक्तीचे भय गुन्हेगारांना नसुन महिला अत्याचाराचे प्रकार दिवसेन दिवस वाढत चालले आहेत. त्याची दखल घेऊन नवीन ठोस कायदा काढून अध्यादेश जरा करावा ही, आमच्या संघटनेने सरकारला विनंती.