पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*
पुणे : मागील काही आठवड्यांमध्ये जम्बो कोविड रुग्णालयात टप्प्याटप्प्याने रुग्णांसाठी बेड तयार करण्यात येत आहेत. जम्बोमधील कार्यान्वित करण्यात आलेल्या एकूण बेड संख्येने आता 600चा टप्पा पार केला आहे. येथील यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे.
आता सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड रूग्णालयात एकूण 600 बैडपैकी 500 बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. उर्वरित 100 बेडपैकी 70 आयसीयू बेड आहेत, तर 30 व्हेंटिलेटर बेड आहेत, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत केली होती. त्याचप्रमाणे महापौर मुरलीधर मोहोळ हे जम्बोची क्षमता वाढवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्या अनुषंगाने येथील यंत्रणा राबविण्यात येत आहे. जम्बो कोविड रुग्णालयात व्यवस्थापन बदलण्यात आल्यावर पुन्हा नव्याने सुरुवातीला शंभर बेड, नंतर दोनशे बेड कार्यान्वित करण्यात आले. मागील दोन आठवड्यापर्यंत चारशे बेड, तर आतापर्यंत एकूण सहाशे बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले आहेत.