30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेली तिमाही व अर्धवार्षिक आर्थिक निकाल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


दिनांक 19 ऑक्टोबर, 2020


30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेली तिमाही व अर्धवार्षिक आर्थिक निकाल


पुणे :- बँक ऑफ महाराष्ट्रने या तिमाहीमध्ये रु.130 कोटी निव्वळ नफा मिळवला. एकूण व्यवसायात रु.2,62,034 कोटी पर्यंत वृद्धी (12.53%), एकूण कर्जांमध्ये रु.1,03,408 कोटी पर्यंतची वृद्धी (13.13%) आणि एकूण ठेवी रु.1,58,626 कोटी पर्यंत वाढल्या (12.15%).


दृष्टीक्षेपात निकाल


कामगिरीची वैशिष्ट्ये : 


आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुस-या तिमाहीचा निव्वळ नफा गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 13.44% आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 28.75% इतका वाढून रु.130 कोटी इतका झाला.


आर्थिक वर्ष 2021-21 च्या दुस-या तिमाहीचा कार्यान्वयन नफा गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 7.18% व मागील तिमाहीच्या तुलनेत 13.47% इतका वाढून रु.806 कोटी इतका झाला.


बँकेचे एकूण उत्पन्न (व्याजाचे निव्वळ उत्पन्न अधिक इतर उत्पन्न) गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 6.98% आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 7.90% वाढून रु.1572 कोटी झाले.


व्याजाचे निव्वळ उत्पन्न (मिळवलेले व्याज वजा दिलेले व्याज) यामधे 30.09.2020 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 4.38% वाढ होऊन ते रु.1120 कोटी झाले.


व्याजाचे निव्वळ प्रमाण 30.09.2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी 2.62% होते. दिनांक 30.09.2019 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी हेच प्रमाण 2.77% तर 30.06.2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी 2.43% होते.


30.09.2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी खर्च व उत्पन्न याचे गुणोत्तर 48.73% इतके सुधारले. 30.09.2019 रोजी संपलेल्या तिमाही साठी ते 48.82% आणि दिनांक 30.06.2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी 51.25% होते.


व्यवसाय वृद्धी :


बँकेचा एकूण व्यवसाय वाढून दि.30.09.2020 रोजी रु.2,62,034 कोटी इतका झाला. त्यामध्ये गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 12.53% तर मागील तिमाहीच्या तुलनेत 4.98% वाढ झाली. 


एकूण ठेवींमध्ये गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 12.15% वाढ होऊन त्या रु.1,58,626 कोटी इतक्या झाल्या.


बँकेचे कासा ठेवींचे प्रमाण (चालू खाते व बचत खाते) दिनांक 30.09.2020 रोजी 50.51% इतके सुदृढ़ आहे. गतवर्षीच्या या तिमाहीच्या तुलनेत यात 17.46% वाढ़ होऊन त्या रु.80,125 कोटी इतक्या झाल्या.  


कासा ठेवींमध्ये बचत खात्यातील रु.66,870 कोटी आणि चालू खात्यामधील रु.13,255 कोटी यांचा समावेश आहे.


एकूण कर्जांमध्ये गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 13.13% वाढ होऊन रु.1,03,408 कोटी झाली.


निव्वळ कर्जांमध्ये गतवर्षीच्या दुस-या तिमाहीच्या तुलनेत 21.31% वाढ होऊन ती रु.97,511 कोटी झाली.


रिटेल कर्जांमध्ये गतवर्षीच्या दुस-या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 20-21 च्या दुस-या तिमाहीत 34.42% वाढ झाली.  


सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना कर्जांमध्ये गतवर्षीच्या दुस-या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 20-21 च्या दुस-या तिमाहीत 32.75% इतकी वाढ झाली.


भांडवल स्थिती :


भांडवल पर्याप्तता गुणोत्तर दि.30.09.2020 रोजी 13.18% व सामान्य भागभांडवल स्तर 1 गुणोत्तर 10.31% इतके होते.


तरलता तरतूद गुणोत्तर (लिक्विडीटी कवरेज रेशो) 221.51% इतके उत्तम होते. नियामकांची शिफारस 80% आहे.


संपत्ती गुणवत्ता :


निव्वळ थकित कर्जे दि.30.09.2020 रोजी 3.30% इतकी कमी झाली. दि.30.09.2019 रोजी त्यांचे प्रमाण 5.48%, आणि दि. 31.06.2020 रोजी 4.10% होते.


एकूण थकित कर्जे दि.30.09.2020 रोजी 8.81% इतकी कमी झाली. दि.30.09.2019 रोजी त्यांचे प्रमाण 16.86% आणि दि. 30.06.2020 रोजी 10.93% होते.


संरक्षक तरतूद गुणोत्तरामध्ये (प्रोविजन कव्हरेज रेशो) 30.09.2020 रोजी 87.15% इतकी सुधारणा झाली. दि.30.09.2019 रोजी हे गुणोत्तर 82.71% आणि दि.30.06.2020 रोजी ते 85.62% होते.


बँकेने एकूण कोविड-19 तरतूद (व्याजासहित) रु.925 कोटी ठेवली आहे. (यापैकी रु.500 कोटी तरतूद चालू तिमाहीत केली आहे). 


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जी कर्ज खाती दिनांक 31.08.2020 रोजी थकित नव्हती त्यांना बँकेने थकित म्हणून घोषित केलेले नाही. सावधानता म्हणून बँकेने रु.120 कोटी जास्त तरतूद केली आहे.


नवीन उपक्रम :


क्रेडिट कार्ड – बँकेने दिनांक 16.09.20020 रोजी स्वत:च्या क्रेडिट कार्डचा आरंभ केला. क्रेडिट कार्ड हे नवीन ग्राहकांसाठी प्रमुख प्रवेशद्वार आहे ज्यामुळे ते बँकेच्या सेवांकडे आकर्षित होतात. बँकेने 31.03.2021 पर्यंत 50 हजार कार्ड व पुढील पाच वर्षात 5 लाख कार्डांचे लक्ष्य निर्धारित केले आहे.


एलएलएमएस – बँकेने एंटरप्राइजवाईड लोन लाईफसायकल मॅनेजमेंट सिस्टीम (LLMS) कार्यान्वित केली आहे. कर्ज प्रक्रिया स्वयंचलित करणे व कागदपत्रांचे डिजिटायझेशन ही त्याची उद्दिष्टे आहेत. कामकाज खर्चात बचत, कर्ज छाननी प्रक्रियेचा दर्जा सुधारणे आणि ग्राहकांचे समाधान वाढवणे यासाठी बँक कर्ज व्यवस्थापन प्रणालीचा वापर करणार आहे.


एचआरएमएस प्रणाली - बँकेमध्ये HRMS प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे मानवी संसाधनासंबंधी सर्व कामे सुटसुटीत होतील व प्रक्रिया व माहिती एकात्म होतील. एचआरएमएस मुळे मानव संसाधनात सर्व म्हणजे भर्तीपासून ते निवृत्तीपर्यंत सर्व कार्यांचे व्यवस्थापन होते.


फिनटेक बरोबर सामंजस्य करार – बँकेने कृषी/ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग/ रिटेल या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्यासाठी फिनटेक टेक्नॉलॉजी बरोबर सामंजस्य करार केला आहे. या सहकार्यामधून वर्षाला रु.700 कोटीचा व्यवसाय करण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले


        निगमित संप्रेषण व निवेशक संबंध


                                प्रधान कार्यालय


लोकमंगल, 


1501, शिवाजीनगर, पुणे 411 005


020-25614324


शीर्ष-व्यवसाय                                      (रू. कोटी मध्ये)


तपशील


रोजी


       वृद्धि (%)


सप्टेंबर 19


जून 19


सप्टेंबर 20


वर्ष ते वर्ष


तिमाही ते तिमाही 


एकूण व्यवसाय


  2,32,847 


    2,49,608 


    2,62,034 


      12.53 


        4.98 


ठेवी


    1,41,441 


    1,52,987 


    1,58,626 


      12.15 


        3.69 


त्यापैकी कासा ठेवी 


       68,212 


       75,824 


       80,125 


      17.46 


        5.67 


एकूण ठेवींमध्ये कासाचे प्रमाण (%) 


48.23%


49.56%


50.51%


             -   


             -   


एकूण कर्जे


       91,406 


       96,621 


    1,03,408 


      13.13 


        7.02 


एकूण गुंतवणूक


       60,303 


       61,150 


       63,581 


        5.44 


        3.98 


नफा क्षमता                                            (रू. कोटी मध्ये)


तपशील


रोजी


       बदल


सप्टेंबर 19


जून 20


सप्टेंबर 20


वर्ष ते वर्ष


तिमाही ते तिमाही 


एकूण उत्पन्न


3,296


3,265


3,319


0.70


1.66


एकूण खर्च


2,544


2,555


2,513


-1.21


-1.62


कार्यान्वयन नफा


752


710


806


7.18


13.47


कर वगळता तरतुदी व आकस्मिकता 


     359 


     609 


     421 


17.17


-30.88


करपूर्व नफा


     393 


     101 


     385 


-1.97


280.51


कर खर्च


     278 


         0 


     255 


-


-


निव्वळ नफा


     115 


     101 


     130 


13.44


28.76


ताळेबंद                                                (रू. कोटी मध्ये)


देणी


रोजी


सप्टेंबर 19


जून 20


सप्टेंबर 20


भांडवल


             5,824 


             5,824 


             6,560 


गंगाजळी


             4,741 


             5,032 


             5,257 


ठेवी


        1,41,441 


        1,52,987 


        1,58,626 


कर्जे


             5,120 


           12,768 


             5,288 


अन्य देणी व तरतुदी


             3,286 


             5,060 


             3,980 


एकूण


        1,60,412 


        1,81,671 


        1,79,711 


मालमत्ता


रिज़र्व बँक ऑफ इंडिया कडील रोख व ठेवी 


             7,059 


           16,956 


             5,438 


इतर बँकांकडील येणी व अल्प सूचनेवरील रक्कम


                  89 


                119 


                  80 


गुंतवणूकी


           59,939 


           60,729 


           63,040 


कर्जे (निव्वळ)


           80,382 


           89,740 


           97,511 


स्थिर मालमत्ता


             1,703 


             1,696 


             1,692 


इतर मालमत्ता


           11,240 


           12,432 


           11,950 


एकूण


        1,60,412 


        1,81,671 


        1,79,711 


गुंतवणुदारासांठी वेगळे सादरीकरण बँकेच्या www.bankofmaharashtra.in या वेबसाइट वर वेगळे देण्यात येत आहे.


फोटो : डावीकडून – 19 ऑक्टोबर, 2020 ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करताना बँक ऑफ महाराष्ट्र चे श्री हेमन्त टम्टा, कार्यकारी संचालक, श्री ए. एस. राजीव, व्यवस्थापकीय संचालक व सीईओ व श्री नागेश्वर राव वाय, कार्यकारी संचालक