मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या डंपरच्या बॅटरी चोरीला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कर्जत,ता.19 गणेश पवार


             नेरळ गावातील महेश चित्र मंदिरच्या मागे उभ्या करून ठेवलेल्या डंपर गाडीच्या एमरोन कंपनीच्या बॅटरीज चोरीला जाण्याची घटना घडली आहे.लॉक डाऊन काळात आणि पावसाळा असल्याने सर्व व्यवसाय ठप्प आहेत आणि त्यामुळे गाडी मोकळ्या जागेत उभी करून ठेवली होती.


               नेरळ गावातील राजेश विजय मिरकुटे यांच्या मालकीचे दोन डंपर मार्च महिन्यापासून सर्व व्यवहार ठप्प असल्याने नेहमीच्या मोकळ्या जागेत उभे करून ठेवले होते.ते डंपर गेली पाच वर्षे राजेश मिरकुटे संध्याकाळ नंतर नेरळ गावातील महेश टॉकीज च्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत उभे करून ठेवले होते.लॉक डाऊन मध्ये सर्व बांधकाम साईट बंद असल्याने कोणताही व्यवसाय दोन्ही गाड्यांना नव्हता,परिणामी गेल्या मार्च महिन्यापासून या दोन्ही गाड्या तेथे उभ्या होत्या.मात्र त्या सुस्थितीत राहाव्यात यासाठी मालक राजेश मिरकुटे हे डंपर चालकाला घेऊन आठ दिवसांनी डंपर सुरू करायला जायचे.नेहमीप्रमाणे 18 ऑक्टोबर रोजी गाडी सुरू करून पाहण्यासाठी चालक बतुल गेले असता एम एच 46-इ-8998 ही डंपर गाडी सुरू झाली नाही.त्यामुळे चालकाने गाडीचे मालक राजेश मिरकुटे यांना ही माहिती दिली.त्यावर राजेश मिरकुटे तेथे पोहचले असता त्यांना त्या ट्रकच्या बॅटरीज चोरीला गेल्या असल्याचे लक्षात आले.याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेरळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.मात्र सध्या कोणाकडेही कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही आणि त्यामुळे रोजगाराअभावी चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यात आता गाड्यांच्या बॅटरी चोरण्याचे प्रकार घडू लागले आहेत.


फोटो ओळ 


याच ट्रकच्या बॅटरीज काढून नेण्यात आल्या आहेत