एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑनलाईन, सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचे आयोजन  (२ ते ४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत)

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे


राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑनलाईन


प्रा.डॉ. विश्‍वनाथ कराड लिखित ‘फे्रन्डस, यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट’


या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि


जागतिक विज्ञान, धर्म व तत्त्वज्ञानावर आधारित



पुणे, :- २९ सप्टेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑनलाइन जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचे (World Parliament of Science, Religion and Philosophy) शुक्रवार, दि.२ ऑक्टोबर २०२० ते रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड लिखित ‘फे्रन्डस, यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ व सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि.२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.१५ वा. होणार आहे.


या समारंभासाठी छत्तीसगडच्या राज्यपाल श्रीमती अनुसया उइके या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. भारताचे केंद्रीय राज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल हे सन्माननीय अतिथी असतील. तसेच, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, जगविख्यात संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि सुप्रसिद्ध विद्वान व साधक स्वामी योगी अमरनाथ हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयू वर्ल्ड पीस फेलोशिपचा शुभारंभ होणार आहे.


या तीन दिवस भरविल्या जाणार्‍या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये १० सत्रे असतील. यात खालील विषयांवर चर्चा होणार आहे.


पहिले सत्रः जागतिक शांतता आणि मानवतेच्या रक्षणासाठी गांधीवादी तत्वज्ञानाला प्रोत्साहन देण्याची गरज.


दुसरे सत्रः जागतिक शांततेत भारताची भूमिका या वर विशेष सत्र


पॅनल चर्चाः विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात शांतता आणि सुसंवाद नांदेल या वर परिसंवाद


तिसरे सत्र - एसडीजी १७ - ध्येयप्राप्तीसाठी भागीदारी


चौथे सत्रः डॉक्टर हे मानवी अस्तित्वाचे आणि शांतीचे देवदूत (कोविड १९ च्या काळात)


पाचवे सत्रः वातावरणातील बदलाचा जागतिक शांततेवर परिणाम (विद्यार्थी सत्र)


सहावे सत्रः जैविक आणि रासायनिक शस्त्रे निमुर्लन करण्याची गरज (परिसंवाद)


सातवे सत्रः तळागळात शांतीसाठी पुढाकार घेणार्‍यांच्या कथा (विद्यार्थी सत्र)


आठवे सत्रः २१ व्या शतकात भारत विश्‍वगुरू होईल या दिशेने वाटचाल


नववे सत्रः भारतीय अभ्यासाचे महत्व, जागतिक शांततेच्या भविष्यासाठी दलाई लामाच्या कार्याचा अभ्यास


दहावे सत्रः वैयक्तिक अस्मिता आणि शांतता (युवा सत्र)


या तीन दिवस चालणार्‍या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये जागतिक स्तरावरील विद्वान, तत्त्वज्ञ, धर्मगुरू, शास्त्रज्ञ, कुलगुरू, शिक्षण तज्ञ, समाजचिंतक व इतर क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत.


त्यामध्ये पद्मभूषण श्री. बिंदेश्‍वरजी पाठक, डॉ एन राधाकृष्णन, श्री. न्यायमूर्ती रोशन शमीम (निवृत्त), प्रा.पुष्पिता अवस्थी (नेदरलँड), फादर वर्गीस अलेंगडेन, शेखर मेहता, आरटीएन लॅरी लन्सफोर्ड , पद्मविभूषण डॉ अशोक एस गांगुली, पूजनीय गुरु यू पंडिता आनंद जी, पद्मश्री डॉ बी. एन. गंगाधर, श्री. अँड्र्यू रसेल, श्री. मंदार आपटे, डॉ. मारिओस अँटोनिओ , सुश्री ज्युलिया रोईग, श्री. डिलन मॅथ्यूज पद्मश्री डॉ.रमण आर गंगाखेडकर, डॉ.भूषण पटवर्धन ,डॉ.अविनाश भोंडवे, पद्मश्री डॉ. दर्शन शंकर देवव्रतसिंग बघेल, श्री. अँड्र्यू सी. वेबर, श्री. मार्क फिनॉड, श्री. साजी प्रीलिस,,प्रा. ओमिद वाली,श्री. ख्रिश्‍चन सिटो सिरिगिरी, सुश्री रीम घुनिम, श्री. जी. किशन रेड्डी, श्री. नित्यानंद राय, श्री. जोशुआ प्रूडोस्की, श्री. स्टीव्ह किलेलेया, स्वामी आत्माप्रियानंद जी, पद्मश्री गुरुजी डॉ. एच. आर. नागेंद्र, प्रा. राणी सदाशिव मूर्ती, श्री.डॉ. दिनेश कात्रे, कु. मीरा कुमार, श्री. राजीव जी मेहरोत्रा, प्रा. (डॉ.) रामदास लँब, श्री प्रतीक गौरी. सुश्री उफ्रा मीर, सुश्री नेहा पंचमिया, श्री.नील डोगन, सुश्री लेस्ली हबार्ड यासारखे अनेक नामांकित विद्वान, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, धर्मपंडित इ. या पार्लमेंटमध्ये सहभागी होऊन, आपले विचार मांडणार आहेत.


सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप समारंभ दि. ४ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६ वा. होणार आहे. भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री ना.श्री. व्ही. मुरलीधरन, छत्तीसगढचे मुख्यमंत्री मा.श्री. भुपेश बघेल, पं. वामदेवशास्त्री, विद्याचार्य आणि प्राध्यापक पद्मभूषण डेव्हीड फेव्हले, गांधी म्यूझियम लाइब्रेरीच्या संचालिका वर्षा दास व सुप्र्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.


या तीन दिवस चालणार्‍या परिषदेमध्ये भारतभरातील सर्व महाविद्यालयामधील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


परिषदेबाबत अधिक माहिती व नांव नोंदणीसाठी www.mitwpu-worldparliament.com <http://www.mitwpu-worldparliament.com>, या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने केलेे आहे.


अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा. डी.पी. आपटे, प्र कुलगुरू प्रा. डॉ. मिलींद पांडे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ संचालक श्री.रविंद्रनाथ पाटील व वर्ल्ड पीस डोमचे संचालक श्री.दर्शन मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.