पत्रकार पांडुरंग रायकर यांना एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे श्रध्दांजली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल         पुणेः टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षाचे होते. पांडुरंग रायकर हे अतिशय अभ्यासू पत्रकार होते. पुण्यातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या होत्या. पत्रकार पांडुरंग हा आपल्यात नाही याची मोठी खंत आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. अशी भावना एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.


अतिशय मनमिळावू स्वभावाचे पांडुरंग रायकर हे आपल्यामध्ये नाहीत याची आम्हाला उणीव जाणवत असल्याची भावना राहुल कराड यांनी व्यक्त केली.