पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- जिद्द , चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संगीत क्षेत्रामध्ये कमी वयात उत्कृष्ट कामगिरी पुण्यातील राहेल राजेंद्र शेकटकर हिने केली आहे .
नवी दिल्ली येथील द ग्लोरियस ऑर्गनायझेशन फॉर असेलेरेटेड टू लिटरसी या राष्ट्रीय संस्थेतर्फे उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र " इंटरनॅशनल गोल अचिव्हर अवॉर्ड " पुणे शहरातील मगरपट्टा येथील अमरदीप सोसायटीमध्ये राहणाऱ्या राहेल राजेंद्र शेकटकर यांना देण्यात आला .
राहेल राजेंद्र शेकटकर या उत्कृष्ट संगीत वाद्यकार व उत्कृष्ट संगीत विशारद शिक्षिका आहेत . राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने देशातील प्रतिष्ठित सर्व्हेमधून हा अवॉर्ड देण्यात आला .
संगीत , नाट्य आणि नृत्य क्षेत्राला मोठी परंपरा आहे . राहेल राजेंद्र शेकटकर यांनी संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे . कोलकत्ता येथे त्यांना मोस्ट पॉवरफुल वूमन इन इंडिया , नॅशनल लीडरशिप अवॉर्ड इन म्युझिक या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . राहेल राजेंद्र शेकटकर यांना २० हुन अधिक आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळाली आहेत . जगातील अव्वल दर्जाचे ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन म्युझिक येथील सर्वात कमी वयाच्या त्या संगीत विशारद आहेत . स्वतः बरोबर चांगले कलाकार घडविण्याची किमयाही तिने करून दाखविली आहे . नवी दिल्ली येथे भारताची राष्ट्रीय प्रतिभा अवॉर्ड देउन सन्मानित करण्यात आले .
शास्त्रीय पध्दतीने व्हायोलिन भारतातील पुण्यातील प. सुरेश गुजर , किराणा घराण्याचे जेष्ठ गायक प. राजकुमार बार्शीकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले . वयाच्या पाचव्या वर्षांपासून तिने कथ्थकचे प्रशिक्षण घेतले . त्या कथ्थक शिकून गंधर्व परीक्षाही उत्तीर्ण झाल्या आहेत .
पाश्चत्य पध्दतीने व्हायोलिन , पियानो , गिटार , ड्रम , कीबोर्ड हा संगीत प्रशिक्षक लॅन्सीलॉट डिसोझा यांच्याकडून घेतले आहे आणि वेस्टर्न वोकलच्या परीक्षासुध्दा तिने दिल्या आहेत . तसेच , वेस्टर्न वोकलमध्ये रॉक आणि पॉप ऑपेरा , वेस्टर्न क्लासिकल यांचे शिक्षण मिसेस वेंडी डिकोस्टा यांच्याकडून तिने घेतले आहेत . पियानोमध्ये ऍडव्हान्स ग्रेड परीक्षा संगीत प्रशिक्षक तनाज इराणी यांच्याकडून मिळाली आहे . नामवंत शेकटकर कुटुंबीय हे गेली तीन पिढ्यापासून संगीताचे घराणे ओळखले जात आहे . नामवंत तबला विशारद किशोर शेकटकर यांची राहेल राजेंद्र शेकटकर हि नात आहे . ती हि परंपरा पुढे चालवीत आहे