मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंदर्भात इन्क्रिडिबल सोशल वर्कर ग्रुप ट्रस्टच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


पुणे :-


           इन्क्रिडिबल सोशल वर्कर ग्रुप ट्रस्टच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले . इन्क्रिडिबल सोशल वर्कर ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष अस्लम इसाक बागवान यांनी सांगितले कि , गेली ७० वर्षे दिनांक १० ऑगस्ट १९५० पासून त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनुच्छेद ३४१ मध्ये पॅरा नं १ नुसार तेव्हाचे राष्ट्रपती कडून हिंदू धर्मा व्यक्तिरिक्त कोणासही आरक्षण देण्यात येऊ नये असा कायदा समंत करण्यात आला . परंतु , सन १९५८ पासून अनुच्छेद ३४१ मध्ये पॅरा ३ नुसार शीख समुदायास आरक्षण देण्यात आले . अनुच्छेद १४ , १५ , १६ , २५ व ४१ नुसार अनुच्छेद ३४१ मध्ये संशोधन करून भारतीय मुस्लिम समाजास न्याय देण्यात यावा अशी मागणी इन्क्रिडिबल सोशल वर्कर ग्रुप ट्रस्टच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .


मुस्लिम आरक्षणाकरिता भारत देशातून बरीचशी आंदोलने करण्यात आली . संसदेमध्ये यावर चर्चा करण्यात आलेली नाही . सच्चंर समिती , मिश्रा समिती , रेहमान समिती या निर्मिती करण्यात आली . यांच्या अहवालानुसार भारतीय मुस्लिम समाजाची परिस्थिती सर्वांसमोर मांडण्यात आली . तरीही अनुच्छेद ३४१ वर संशोधन करून सर्व समितीच्या आधार घेऊन भारतीय मुस्लिम समाजास शैक्षणिक , राजकीय , सरकारी संस्था व इतर यामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येनुसार आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली 


            या आंदोलनात शाहनवाज पठाण , शाहीन सिंदगी , राजू सय्यद , सचिन आल्हाट , शर्मिष्ठा आल्हाट , युनूस खान , वासिम पटेल , कबीर शेख , राशिद अली , राज फैय्याज , जहीर शेख , आयेश मरास , अब्दुल करीम आदी उपस्थित होते .


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान