मनसे छ. शिवाजी महाराज मतदार संघांच्या वतीने, ताळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळातील वीजबिल माफ करण्यासंदर्भात.  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मा. संपादक,


दैनिक :


आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धीस द्यावे हि विनंती..


विषय : ताळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळातील वीजबिल माफ करण्या संदर्भात.  


महोदय, 


सध्या कोरोना या महामारीमुळे संपुर्ण जगातील नागरिक पुरते संकटात सापडले आहेत. सरकारने या महामारीच्या काळात ताळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केली होती. या ताळेबंदीच्या(लॉकडाऊन) काळात म्हणजेच गेल्या तीन महिन्यात गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाचे पूर्ण हाल सुरु आहेत. छोट्या मोठ्या सर्वच रोजगाराचे साधन याकाळात बंद असल्याने गेल्या तीन महिन्यात नोकरदार वर्गाला पगार मिळाला नाहीये तर पथारीवाले, छोटे दुकानदार, सेवा व्यावसायिक, यांचे उद्योगही पूर्णपणे बंद आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक अडचणींमुळे व कर्जबाजारीपणामुळे अनेक नागरिक आत्महत्या करीत आहेत. 


लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना सरासरी वीजबिले देण्यात आली आहेत परंतु नोकरी व्यवसाय बंद असल्याने हि बिले भरणे शक्य नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिक आधीच आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना वीजबिल भरणे शक्य नाहीये,  


तरी आपण ऊर्जामंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून पुणे शहरातील गरीब व मध्यमवर्गीयांचे एप्रिल ते ऑगस्ट २०२० या कालावधीतील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून आकारण्यात येणारे वीजबिल माफ करावे हि विंनती. अशाप्रकारचे निवेदन आज गुरुवार दि १७/०९/२०२० रोजी मा कार्यकारी अभियंता, शिवाजीनगर विभाग कार्यालय, म.रा.वि.वि.कं.मर्या. सेनापती बापट रस्ता, पुणे, यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष सुहास निम्हण, विभाग सचिव विनायक कोतकर, महिला अध्यक्षा लावण्यताई शिंदे, तसेच विभागातील सर्व प्रभाग अध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. 


 सहकार्य असावे,                                                  आपला राष्ट्रबांधव,                


           सुहास भगवानराव निम्हण 


(अध्यक्ष : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)