करोना चाचणीला नागरिकांचा विरोध; पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


.....


 भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील गणेश देवल नगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या रहिवाशांनी करोना चाचणी करण्यास विरोध दर्शवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व रहिवाशांनी पालिका मुख्यालयात येऊन चक्क ठिय्या आंदोलन केल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले. मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्व नागरिकांची करोना चाचणी करण्यात येत आहे; परंतु त्यास भाईंदर पश्चिम भागातील गणेश देवल नगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी आरोप केले आहेत की, प्रत्येकाची बळजबरीपणाने करोना चाचणी करण्यात येत असून त्यामुळे लहान मुलांच्या आणि महिलांच्या नाकाला इजा होत आहे. तसेच करोनाच्या नावावर गेल्या पाच महिन्यांपासून लादण्यात आलेल्या नियमांमुळे बेरोजगार होण्याची वेळ त्यांवर आली आहे. त्यामुळे ‘आयुक्त बदलो’ अशी घोषणा देत नागरिकांनी पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
तुळशीबाग श्रीराम मंदिर
Image
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image