कंगनाचा कागंवा होणार होम क्वारंटाईन*......

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*कंगनाला होम क्वारंटाईन करणार, किशोरी पेडणेकर*


*मुंबईच्या महापौरांनी नियम दाखवला*


*मुंबई : -* “अभिनेत्री कंगना रनौत ही येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यावेळी तिला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जाईल,” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. “परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जातं. त्यानुसार कंगनालाही होम क्वारंटाईन केलं जाईल,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.          


“येत्या बुधवारी (9 सप्टेंबर) कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे.”


Advertisement


Powered By ADGEBRA


ICMR च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, परराज्याततून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचे नियम आहेत. मी प्रशासनाकडून माहिती घेतली. आज किंवा उद्यामध्ये काही नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.


*कंगनाचा कागंवा होणार होम क्वारंटाईन*......