*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*
*मुंबई प्रतिनिधी :-* महाविकास आघाडी सरकार मधील शालेय शिक्षण,
महिला व बालविकास राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री
नामदार मा. बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. कालच अहमदनगरचे पालकमंत्री
हसन मुश्रीफ यांची चाचणी पोझिटीव्ह आली होती.
राज्यमंत्रीमंडळातील अनेक मंत्री हे कोरोना विषाणू संसर्गने बाधित होत आहेत.
जनसंपर्क व सततचे
जिल्ह्यादौरे यांमुळे अनेक लोकप्रतिनिधी हे देखील कोरोना
विषाणूने बाधित होतांना दिसत आहेत.