पत्रकार कमल कचर कर्डक यांची दैनिक मराठवाडा केसरीच्या मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी पदी नियुक्ती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल मुंबई :- पत्रकार कमल कचर कर्डक यांची दैनिक मराठवाडा केसरीच्या मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली. मुंबईतील पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या पत्रकार कमल कचर कर्डक यांनी आजवर केलेल्या उत्कृष्ट सकारात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची दैनिक मराठवाडा केसरीच्या मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल मुंबई विभागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, तसेच सर्व स्तरातील लोकांनी पत्रकार कमल कचर कर्डक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे . तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सैदव पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी अथक प्रयत्न करून समाज सेवा करणाऱ्या कमल कचर कर्डक यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक कार्य केल्याबद्दल अनेक सामाजिक संस्थेचे पुरस्कार मिळाले आहेत. कमल कचर कर्डक यांनी सदैव पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून आदर्श निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा केली आहे. तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत राहून वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांसाठी महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तीचीं दखल घेऊन त्यांच्या कार्याला लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिद्धी दिली आहे . पत्रकार कमल कचर कर्डक यांनी समाजातील सर्व स्तरातील सामान्यवाचकां पासुन ते सुशक्षितवाचकां पर्यंत साऱ्यांनाच वृत्तपत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्या पत्रकारितेच्या माध्यमातून अहोरात्र जनतेसाठी जनजागृतीचे अभिमानास्पद महान कार्य करीत आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सामाजिक संस्था , विविध संघटनांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच भुमि जनशक्ति परिवर्तन शेतकरी या शेतकरी संघटनेच्या मुंबई शहर महिला अध्यक्ष पदी कमल कचर कर्डक यांची निवड करण्यात आली आहे. दैनिक मराठवाडा केसरीच्या मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी पदी निवड झाल्या बद्दल पत्रकार कमल कचर कर्डक यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात सर्वत्र हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले जात आहे.


लक्ष्मण राजे


मुंबई


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान